भारत हा मधूमेहाची राजधानी होणार आहे. एका सर्व्हेक्षणात भारतातील 40 वर्षांवरील व्यक्ती ही लठ्ठपणाची शिकार झाली आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर आणि डायबिटीसमुळे अनेक जण आजारी आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती एकसारखी नसते. डायबिटीजमुळे पिडीत व्यक्तीचा आहार देखील एक सारखा नसतो. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी शरीराला एक्टीव्ह ठेवणे गरजेचे असते. परंतू आयुर्वेदिक वनस्पतीमुळे शरीरातील शुगर कंट्रोल ठेवणे सोपे जाते. ज्येष्ठमधाची कांडी यासाठी रामबाण ठरु शकते. यात एंटीऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वे भरपूर असतात.चला तर पाहूयात ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी ज्येष्ठमधाच्या काड्या कशा फायदेशीर ठरतात…
शरीरात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी ज्येष्ठमध खूप महत्वाचे आहे. वास्तविक ज्येष्ठमधात एंटीऑक्सीडेंट्स भरपूर असते. डायबिटीज दरम्यान होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी ज्येष्ठमध वनस्पती खूप फायद्याची आहे. काही संशोधनानूसार ज्येष्ठमधाच्या काड्यांचे सेवन केल्याने सारखी सारखी साखर खाण्याची इच्छा कंट्रोल होते.
ज्येष्ठमधाच्या ( मुलेठी) ब्लड शुगर लेव्हल काही प्रमाणात कमी होऊ शकते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तोंडात ज्येष्ठमधाच्या काड्या ठेवाव्यात. ज्येष्ठमधाच्या काड्यामुळे तुम्हाला साखर खाण्याची इच्छा होत नाही.
ज्येष्ठमधाच्या चहा तयार करण्यासाठी 1 कप पाणी घ्यावे, त्यात 2 ते 3 ज्येष्ठमधाच्या काड्या टाकून चहा बनवावा. नंतर गाळून हा चहा घ्यावा त्याने ब्लड शुगरची लेव्हल कमी होईल
एक बारमाही मिळणारे वनऔषधी आहे. याचे मूळ दक्षिण युरोप आणि पश्चिम आशियामध्ये आहे.वनस्पतीचे इंग्रजी नाव Glycyrrhiza glabra आहे. त्याचा ग्रीक भाषेतील अर्थ Glykys (गोड) आणि Rrhiza (रूट) या दोन शब्दांपासून बनलेला आहे.
( Disclaimer : ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. अधिक माहीतीसाठी तुमच्या फॅमिडी डॉक्टरशी संपर्क करावा )