शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर अनेक आरोग्यास हानिकारक समस्या निर्माण होतात. एकदा कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर तिला कंट्रोल करणे कठीण असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत एक नैसर्गिक उपाय सांगितलेला आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या मते कडूनिंबाची पाने चावून खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात करता येऊ शकतो. चला तर पाहूयात आयुर्वेदिक तज्ज्ञांनी कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी कडूनिंबाची पाने चावून खाण्याचे काय फायदे असतात ?
कडूनिंबाच्या पानात औषधीय गुणधर्म असतात. यातील एंटीऑक्सीडेंट आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण कॉलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कडूनिंबाचा पाला पाहीला तरी त्यांची कडवडपणामुळे अनेक जण नाक मुरडत असतात. कडूनिंबाच्या पानांचा स्वाद जरी कडू असला तरी त्याचे गुणधर्म अत्यंत औषधी आहेत. कडूनिंबाची पाने अनेक आजारांवर रामबाण उपचार आहेत.
कडूनिंबाच्या पानांमध्ये आढळणारी काही संयुगे बॅड कॉलेस्ट्रॉलची ( LDL ) पातळी कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.
कडुनिंबाच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी ( HDL ) वाढवते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले रहाते.
काढा – कडूनिंबाच्या पानांना उकळून त्याचा काढा बनवावा आणि सकाळी रिकाम्या पोटी तो प्राशन करावा
कडूनिंबाची पावडर – कडुनिंबाच्या पानांना वाळवून त्याची पावडर तयार करावी आणि पाण्यासोबत घ्यावी
कडूनिंबाचा चहा – कडू निंबाचा चहा दिवसातून एकदा प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते.