मुंबई : कॉलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील एक आवश्यक घटक आहे. कॉलेस्ट्रॉल चे पातळी 200 mg/dL पेक्षा कमी असणे चांगले मानले जाते. मात्र या पातळीपेक्षा जादा प्रमाण घातक मानले जाते. त्यामुळे हार्ट अॅटॅक, स्ट्रोक सहीत अनेक प्राणघातक स्थिती निर्माण होऊ शकते. दरवर्षी हाय कॉलेस्ट्रॉलमुळे अनेक आपले प्राण गमवतात. आजकाल कॉलेस्ट्रॉलचा ( Cholesterol ) आजार साथीसारखा वाढत चालला आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती या आजाराने ( disease ) पीडीत होत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी यापासून सावध राहिले पाहीजे.
कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे असल्याचे सुरूवातीला लक्षात येत नाही. ज्यावेळी स्थिती गंभीर होते त्यावेळी आपल्याला समजते, काही जण पुरेशी काळजी घेत नाहीत, बेफीकीर राहतात. कॉलेस्ट्रॉल कंट्रोल करणे फार अवघड नाही. छोट्या, छोटया गोष्टी करूनही आपण त्याचा धोका कमी करू शकतो. कोलेस्ट्ऱॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, अयोग्य लाईफस्टाईल आणि अनहेल्दी डायट मानले जात आहेत.
कॉलेस्ट्रॉलचे कोणतेही बाह्य लक्षणे दिसत नाही..
मायो क्लीनिकच्या अहवालानूसार कॉलेस्ट्रॉल वाढल्याचे कोणतेही बाह्य लक्ष दिसत नाही. सूरूवातीला या आजारीची कोणतीही लक्षणे दिसत नाही. म्हणूनच त्याला सायलंट किलर असे म्हटले जाते. कारण तो हळूहळू वाढच असतो. वाढते कॉलेस्ट्रॉल आणि एखाद्या व्यक्तीच्या प्राणावर बेतू शकते. कॉलेस्ट्रॉल हे फक्त रक्ताच्या तपासणीद्वारे शोधले जाऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी लोकांनी वेळोवेळी रक्त तपासणी करून घ्यावी.
हे पाच उपाय करून कॉलेस्ट्रॉल रोखा
दररोज 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करा.
सकस आहार घ्या आणि जंक फूड टाळा.
धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा
आपले वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
तुमची रक्त तपासणी वेळोवेळी करून घ्या.