Smoking Side effects: धूम्रपान केल्याने त्वचेचेही होऊ शकते नुकसान, पिगमेंटेशनचाही धोका

| Updated on: Jan 04, 2023 | 12:21 PM

लोकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम माहीत असले तरी त्यापासून दूर राहणे त्यांना शक्य नसते. धूम्रपानाचा केवळ आपल्या शरीरावरच नव्हे तर त्वचेवरही गंभीर परिणाम होतो.

Smoking Side effects: धूम्रपान केल्याने त्वचेचेही होऊ शकते नुकसान, पिगमेंटेशनचाही धोका
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आजकाल बऱ्याच लोकांना धूम्रपानाचे (smoking) व्यसन असते. जवळजवळ सर्व वयोगटातील लोक या व्यसनाला बळी पडत आहेत. या व्यसनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि अनेक आजार (health disease) होऊ शकतात. धूम्रपान करणाऱ्या लोकांना कॅन्सर (cancer), फुफ्फुसाचे आजार, स्ट्रोक आणि इतर अनेक समस्या होऊ शकतात.

लोकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम माहीत असले तरी त्यापासून दूर राहणे त्यांना शक्य नसते. धूम्रपानाचा केवळ आपल्या शरीरावरच नव्हे तर त्वचेवरही गंभीर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार धूम्रपानामुळे त्वचा पातळ होऊ शकते आणि वेळेपूर्वीच त्वचेवर सुरकुत्याही येऊ शकतात. धूम्रपानामुळे त्वचेचे आणि शरीराचे नुकसान होऊ शकते. सिगारेट ओढल्याने माणूस आणखी वृद्ध दिसतो.

धूम्रपानामुळे त्वचा पातळ होते

हे सुद्धा वाचा

धूम्रपानामुळे त्वचा पातळ होते. अभ्यासात असे आढळून आले आहे की धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीची त्वचा धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेपेक्षा 40% पातळ असते.

अकाली वृद्धत्व

धूम्रपानामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि अकाली वृद्धत्व येते. धूम्रपानामुळे कोलेजनचा स्तर कमी होतो, जो आपली त्वचा मोकळा ठेवण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी महत्वाचे आहे. धूम्रपानामुळे त्वचेला ताकद आणि लवचिकता देणार्‍या इलास्टिन तंतूंचे नुकसान होऊन सुरकुत्या पडण्याच्या प्रक्रिया वेगाने होते.

लठ्ठपणाही वाढतो

तसेच धूम्रपानामुळे अंतःस्रावी प्रणालीवर परिणाम होऊन शरीराचा एकूण आकार बदलतो, जो हार्मोनच्या स्रावासाठी जबाबदार असतो आणि लठ्ठपणा वाढू शकतो.

जास्त काळ सिगारेट ओढल्याने नखांचा रंग बदलतो, दात पिवळे पडतात आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.

चेहऱ्यावर पिगमेंटेशनचा धोका

धूम्रपानामुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशनचा येण्याचा धोका असतो. धूम्रपानामुळे मेलॅनिनची पातळी वाढते त्यामुळे चेहऱ्यावर काळे डागही पडतात. हे पिगमेंटेशन हळूहळू वाढते आणि संपूर्ण चेहऱ्यावर पसरते. बरेच लोक धूम्रपान करताना सिगारेट बोटांच्यामध्ये बराच काळ धरून ठेवतात, त्यामुळे निकोटीन आणि इतर रसायनांमुळे हाताची त्वचा पिवळी पडते. यामुळे बोटांना संसर्ग होण्याचा धोकाही असतो.