Health Benefits of Cinnamon: महिलांसाठी वरदान ठरते दालचिनी, ‘या’ आजारांमध्ये मिळतो आराम

| Updated on: Dec 14, 2022 | 11:10 AM

हार्मोन्सच्या असंतुलनामुळे PCOS ची समस्या उद्भवते. त्याचे अनेक दुष्परिणाम असतात.

Health Benefits of Cinnamon: महिलांसाठी वरदान ठरते दालचिनी, या आजारांमध्ये मिळतो आराम
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – सध्याच्या धावपळीच्या युगात निरोगी राहणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. विशेषत: महिलांसाठी (woman health) हे आणखी कठीण काम होतं. हार्मोनल बदलांमुळे (hormonal changes) महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना प्रकृतीकडेही नीट लक्ष देता येत नाही ज्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चुकीची दिनचर्या आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे अनेक आजार होतात. PCOS (Polycystic ovary syndrome) हा त्यापैकीच एक असून आजकाल तो खूप सामान्य झाला आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आजार होतो. जर एखाद्या महिलेला पीसीओएसची समस्या असेल तर त्यापासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरते.

दालचिनीच्या वापराने PCOS मध्ये आराम मिळतो. दालचिनी महिलांसाठी वरदान ठरते असा दावा अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक पोषक घटक आढळतात, जे विविध प्रकारच्या आजारांवर फायदेशीर ठरतात. दालचिनीचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

PCOS म्हणजे काय ?

आपल्या शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS ची समस्या उद्भवते. खराब दिनचर्या, धूम्रपान, मद्यपान करणे, रात्री उशीरापर्यंत जागणे यामुळेही हा त्रास होतो. या आजाराचे अनेक दुष्परिणाम होतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमे, चेहऱ्यावर केस उगवणे, वजन वाढणे, केसगळती असे अनेक त्रास होतात. या स्थितीत अंडाशयात अंडी तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये, अंडाशयात अंडी तयार होत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर, गर्भाशयातून अंडी बाहेर पडत नाही. या समस्येचा आपल्या आरोग्यावर बराच परिणाम होतो.

दालचिनी ठरते उपयुक्त

PCOS च्या त्रासामध्ये महिलांसाठी दालचिनीचे सेवन फायदेशीर ठरते. त्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा दालचिनीची पूड घालून पाणी चांगले उकळावे. त्यानंतर चहाप्रमाणे या दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. तुम्हाला हवे असेल तर चवीसाठी तुम्ही त्यामध्ये लिंबू आणि थोडा मधही घालू शकता. याच्या नियमित सेवनाने फायदा होतो.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)