नारळाशिवाय मराठी माणसाच्या घरातील स्वयंपाक तरी पूर्ण होईल का? नारळ नाही आणि स्वयंपाक होतोय ही कल्पना तरी करता येते का? महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील अन्न पदार्थात नारळाचा सर्रास वापर होतो. कोकणात तर नारळाचा जेवढा वापर होतो, तेवढा कुठेच होत नसेल. तुमची करी, पिठलं आणि इतर विविध पदार्थांमध्ये नारळाचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. मासे आणि मटणात तर नारळ टाकलेलं नसेल तर त्या खाण्याला चव तरी कशी येईल? परंतु आपल्या आहाराच्या सवयीमध्ये बदल झाला आहे. त्याचे मुख्य कारण आजार आहेत. अनियमित आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे आजची पिढी अनेक आजारांनी वेढली गेली आहे.
सध्या बहुतेक लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवत आहे. त्याचा वयाशी काहीच संबंध नाही. आपल्या आहाराच्या सवयीचं या स्थितीला कारणीभूत आहेत. आहारावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच व्यायामही अनिवार्य आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तेलाचा वापर कमी करण्याबरोबरच नारळालाही नाही म्हटलं जातं. परंतु नारळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो का?
नारळात भरपूर प्रमाणात फिनोल्स असल्यामुळे ते उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते, असं शास्त्र सांगतं. नारळात ऑक्सिडेटिव्ह डॅमेज कमी करून पेशीला निरोगी ठेवण्यास मदत होते. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलच्या पातळीत कमी होऊ शकते.
नारळच नाही, तर शुद्ध नारळ तेल देखील हे फायदे देऊ शकते. ते वापरण्याची पद्धत महत्त्वाची आहे. भाजून आणि तळून किंवा गरम करून त्याचा वापर केल्यास त्याचे फायदे कमी होतात. नारळ आणि नारळ तेल योग्य पद्धतीने वापरल्यास शरीराच्या आहारास संतुलित करण्यास मदत होईल. यामुळे शरीरातून विषाक्त पदार्थ निघून जातात आणि पचन तंत्र सुधारते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो.
मुबलक प्रमाणात नारळ तेल शरीरात गेल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. नारळ भाजून आणि तळून किंवा गरम करून वापरण्याऐवजी तेल चांगल्याप्रकारे भातात किंवा इतर पदार्थात थोडे टाकून खाणे चांगले आहे. शुद्ध नारळ तेलाचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
नारळाच्या दूधापेक्षा कच्चे नारळ खाणे अधिक चांगले आहे. दूध करताना त्यातील फायबर्स कमी होतात. याशिवाय नारळ किसून बनवलेले पदार्थ खाणे देखील चांगले नाही. भाजलेलं नारळ करीमध्ये वापरणे देखील योग्य नाही, कारण भाजल्यामुळे त्यातील पाणी निघून जाऊन हायड्रोकार्बन तयार होतात.
नारळ भाजल्यावर लाल होते, कार्बनच्या संयुगांमुळे हे घडते. आम्लता आणि पोटाच्या जळजळीस ते कारणीभूत ठरू शकते. भाजलेलं नारळ फक्त त्याचे फायदे गमावतेच असं नाही, तर कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांसाठी देखील कारणीभूत ठरू शकते.