सतत पिता ब्लॅक टी, लेमन टी ? व्हा सावध, त्याचे साईड इफेक्ट्स तर जाणून घ्या

| Updated on: Jul 03, 2023 | 5:45 PM

तुम्ही चहाचे जास्त सेवन करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे किडनीशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच यकृताचेही नुकसान होऊ शकते.

सतत पिता ब्लॅक टी, लेमन टी ? व्हा सावध, त्याचे साईड इफेक्ट्स तर जाणून घ्या
Image Credit source: freepik
Follow us on

Side Effects of Black Tea : जगभरात कोट्यावधी चहाप्रेमी आहेत. भारतातही बहुतांश लोकांना दिवसभरात २-३ कप चहा पिण्याची आवड आणि सवयही असते. एखादी हेल्दी व्यक्ती १-२ कप चहा (tea) प्यायल्यास काहीच नुकसान नाही. मात्र कोणी त्यापेक्षा जास्त चहा प्यायल्यास त्यामुळे त्रास होऊ शकतो.

मुंबईत एका ४२ वर्षीय व्यक्तीला जास्त चहा पिण्याची सवय नडली, त्यामुळे त्याच्या किडनीवर परिणाम झाला व रुग्णालयात दाखल करावे लागले. खरंतर तो माणूस रोज ग्रीन किंवा लेमन टी पीत होता व त्यामध्ये व्हिटॅमिन सी घालत असे. कोरोना नंतर, व्हिटॅमिन सी चा ट्रेंड इतका वाढला की काही लोकांनी ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट केले आहे. पण चहासोबत व्हिटॅमिन सी घेतल्याने किडनी आणि यकृतावर वाईट परिणाम होतो आणि इतर अनेक आजारांचा धोका देखील वाढू शकतो.

किडनी स्टोनचा धोका

डॉक्टरांच्या सांगणायानुसार, कोविडच्या काळात रोज ब्लॅक टी व त्यासह व्हिटॅमिन सी सेवन करण्याचा ट्रेंड वाढला होता. पण प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज नसते. ज्या व्यक्तींना आरोग्याच्या इतर समस्या आहेत, त्यांनी जास्त चहा आणि व्हिटॅमिन सी चे सेवन करणे अत्यंत घातक ठरते. चहाचे जास्त सेवन केल्याने शरीरावरही विपरीत परिणाम होतो.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेक कप ब्लॅक टी पिणे ही सवय अतिशय धोकादायक ठरू शकते. व्हिटॅमिन सी हे शरीरासाठी अतिशय आवश्यक असते. शरीराचा विकास आणि लोह शोषले जावे यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते. आपल्याला दररोज 75 ते 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. हे मुख्यतः अन्नातून मिळते. जर कमतरता असेल तर डॉक्टर 1000 मिलीग्राम पर्यंत व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेण्याची शिफारस करतात.

जास्त चहा आणि व्हिटॅमिनमुळे अनेक आजार

मात्र जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतले तर ते शरीरात तुटते आणि ऑक्सलेटमध्ये बदलते. ज्यामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि ते किडनी स्टोनच्या स्वरूपात दिसून येते. एवढेच नाही तर व्हिटॅमिन सीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृत, संधिवात तसेच किडनीचे आजार होऊ शकतात. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्यास किडनीच्या कार्यावर परिणाम होतो आणि काही प्रसंगी किडनी निकामी देखील होऊ शकते.