Health tips: जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोना महामारीमुळे आता वर्क फॉर्म होम (Work Form Home) कल्चर चांगलेच रुजले आहे. लॉकडाऊनमुळे सुरू झालेले ऑनलाईन क्लासेस (Online classes)आणि वर्क फॉर्म होममुळे प्रत्येकाचाच स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. महामारीमुळे जवळपास सर्वच गोष्टी डिजीटल झाल्या आहेत. मात्र वाढत्या डिजिटलीकरणाचा डोळ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, दृष्टी सुधारण्यासाठी, व्यायाम करणे, स्क्रीन पाहताना चष्मा घालणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. याचबरोबर तुम्ही जर आहारत योग्य पदार्थांचा समावेश केला तर त्याचा दोखील तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदा होते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ आहारात अनेक आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना करतात. आज आपण अशाच काही पदार्थांची माहिती घेणार आहोत, ज्याचा आहारात समावेश कोल्याने तुमचे डोळे दिर्घकाळ निरोगी राहण्यास तसेच तुमच्या डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.
त्रिफळा चूर्ण : त्रिफळा चूर्ण, तूप आणि मध समप्रमाणात मिसळून रात्री घेतल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्याची दृष्टी सुधारण्यास देखील मदत हेते.
आवळा : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सीमुळे डोळयातील पडदा पेशी तसेच कोशिका वाढण्यास मदत होते. आवळ्याच्या नियमित सेवनामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते.
काळे मीठ : तुम्हाला जर डोळ दुखीचा त्रास असेल तर नियमित काळ्या मिठाचे सेवन करा. काळ्या मिठाच्या नियमित सेवनाने तुम्हाला डोळ्यांच्या विविध त्रासांपासून आराम मिळण्यास मदत होते.
मनुका : मनुकामध्ये असलेले पॉलीफेनॉलिक फायटोन्यूट्रिएंट्समुळे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच डोळ्याच्या विविध आजारांपासून देखील आराम मिळतो.
बदाम : बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. बदामाच्या नियमित सेवन केवळ मेंदूसाठीच नाही तर डोळ्यासाठी देखील उपयुक्त असते. जे नियमित चष्माच्या वापर करतात ज्यांची दृष्टी कमकुवत आहे, अशा लोकांना नियमित बदामाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
हळद : हळद तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कर्क्यूमिन तत्व असते. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हळदीचे नियमित सेवने केल्याने डोळे कोरडे पडण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
मध : डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टीदोष नाहीसा करण्यासाठी मधाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मध हे एक नैसर्गिक स्विटनर आहे. मध हे तुम्हाला दिर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते.
हो खरयं… आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची… काय आहे नेमका दावा…
औरंगाबादेत दहा महिन्यात 150 कुष्ठरोगी आढळले, कोरोना काळानंतर प्रथमच सर्वेक्षण, काय आहेत कारणं?