नवी दिल्ली : पोळी (roti) हा लोकांच्या आहाराचा एक भाग आहे. उत्तर भारतात तर पोळी खाल्ल्याशिवाय लोकांचं जेवण पूर्ण होत नाही आणि पोटही भरत नाही. काही प्रदेशात रोटीला चपाती असेही म्हणतात. तर, त्याला इंग्रजी ब्रेड म्हणतात. पोळी तयार करणे ही एक सामान्य प्रक्रिया (roti making process) आहे. तेल व पाणी घालून कणीक मळली जाते व थोडा वेळ तशीच ठेवण्यात येते. नंतर ती पोळपाटावर लाटून एक बाजू तव्यावर शेकली जाते आणि नंतर थेट विस्तवावर भाजून (on flame) पोळी किंवा फुलका तयार होतो.
पण तुम्हाला माहीत आहे का की, अनेक प्रक्रिया पार करून तयार झालेली पोळी ही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषत: थेट आचेवर किंवा विस्तवावर भाजली जाते, मात्र ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. हेही एका अभ्यासातून समोर आले आहे.
नव्या अभ्यासातून आली माहिती समोर
जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधनानुसार नैसर्गिक वायूची शेगडी आणि गॅस स्टोव्हमधून कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सूक्ष्म कण बाहेर पडतात. हे सर्व कण शरीरासाठी धोकादायक असतात. या प्रदूषकांमुळे श्वसनाचा त्रास, हृदयविकार आणि अगदी कॅन्सरही होऊ शकतो. याशिवाय न्यूट्रिशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये आणखी एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले की, जेव्हा अन्न उच्च आचेवर शिजवले जाते तेव्हा कार्सिनोजेन्स तयार होतात. हे देखील शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी योग्य मानले जात नाही.
शेकणं योग्य नाही, जुना अभ्यासही हेच सांगतो
फूड स्टँडर्ड्स ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांनी 2011 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार, जेव्हा पोळी थेट ज्वाळांच्या संपर्कात येतो, तेव्हा यापासून एक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होत असे. पण गव्हाच्या पिठात नैसर्गिक साखर आणि प्रथिनेही असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्या कणकेची पोळी लाटून ती गॅसवर भाजल्यानंतर कार्सिनोजेनिक रसायने तयार होतात. त्याचे सेवन सुरक्षित मानले जात नाही.
मग काय करावे ?
यासंदर्भात आणखी अभ्यास व्हायला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानंतरच चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. तथापि, पोळी मोठ्या आचेवर अजिबात भाजू नये. त्यामुळे कार्बनयुक्त कण आणि विषारी घटक शरीरात जातात.