कोरोना झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज किती दिवस राहतात? चकीत करणारी माहिती समोर

| Updated on: May 13, 2021 | 2:51 PM

इटलीतील (Italy) वैज्ञानिकांनी कोरोनानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies) बाबत मोठी माहिती दिली आहे.

कोरोना झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज किती दिवस राहतात? चकीत करणारी माहिती समोर
Antibodies
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने (India Corona cases) वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही (Covid 19 death) मन हेलवणारी आहे. कोरोनाच्या या लढाईत लस (Vaccine) हे प्रमुख शस्त्र आहे. याचदरम्यान आता इटलीतील (Italy) वैज्ञानिकांनी कोरोनानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies) बाबत मोठी माहिती दिली आहे. वैज्ञानिकांच्या मते, कोरोनातून बरं झाल्यानंतर जवळपास 8 महिने रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरोधी अँटीबॉडीज राहतात. (corona Antibodies how many days remain in body Italy study reveals new data)

कोरोनाविरोधी अँटीबॉडीज शरीरात असेपर्यंत कोरोना विषाणूचा धोका कमी होतो. मिलानच्या सैन राफेल रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, कोरोना रुग्णांमध्ये ज्या अँटीबॉडीज बनतात, त्या रुग्णाचं वय, अन्य व्याधींची बाधा झाल्यानंतरही रक्तात कायम राहतात. त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका खूप कमी होतो.

162  रुग्णांची निवड 

इटलीतील संशोधकांनी अभ्यासासाठी, कोरोनाची लक्षणे असलेल्या 162 रुग्णांची निवड केली होती, ज्यांना मागील वर्षीच्या कोरोना लाटेत संसर्ग झाला होता. त्यांचे रक्ताचे नमुने आधी मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले होते. त्यानंतर जे कोरोनातून बरे झाले, त्यांचे रुक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. त्यामध्ये असे निदर्शनास आलं की, त्या रुग्णांच्या शरीरात आठ महिन्यांपर्यंत रोगाशी लढणाऱ्या अँटीबॉडी तयार झाल्या होत्या.

संशोधकांचा हा अहवाल ‘नेचर कम्युनिकेशन्स साइंटिफिक जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांच्या अँटीबॉडीवर भर देण्यात आला होता.

संबंधित बातम्या 

Maharashtra lockdown Extended | राज्यात कोरोनाचा विळखा, कडक निर्बंध 1 जूनपर्यंत लागू राहणार     

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर आवश्यक, बाधितांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी : NTAGI  

(corona Antibodies how many days remain in body Italy study reveals new data)