मुंबई : सध्या जगभरात कोरोन विषाणूमुळे (Corona) हाहाकार माजला आहे. केवळ कोरोनाच नाही तर या विषाणूमुळे अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाच्या ‘फंगल’ इन्फेक्शनमुळे (Fungal Infection) डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होत असल्याच्या वृत्तांवर केंद्राने मंगळवारी (15 डिसेंबर) म्हटले की, कोरोनामध्ये एकतर हा लक्षणांशिवाय उद्भवलेला किरकोळ आजार असू शकतो किंवा समस्यांच्या गुंतागुंतीमुळे असा गंभीर आजार उद्भवू शकतो जो यापूर्वी कधी समोर आला नव्हता (Corona may cause fungal infection can affect on eye light doctors claim).
स्थानिक, सर गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी याविषयी बोलताना सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून कोरोनामुळे ‘म्यूकोर मायकोसिस’ ची 13 प्रकरणे पाहिली आहेत. यावर ते म्हणाले की, हा चिंताजनक रोग नवीन नाही परंतु दुर्मिळ आहे. यामध्ये नवीन गोष्ट म्हणजे तो कोरोनामुळे निर्माण होणारा ‘म्यूकोर मायकोसिस’ आहे.
रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 15 दिवसांत ईएनटी विभागातील डॉक्टरांना कोरोनामुळे ‘बुरशीजन्य’ संसर्गाची 13 प्रकरणे आढळली आहेत. त्यातील 50 टक्के रुग्णांचे डोळे खराब झाले आहेत. शिवाय या रुग्णांमध्ये नाक आणि जबड्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात तज्ज्ञांन विचारले असता निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल (व्हीके पॉल) यांनी एक अहवाल सादर करत म्हटले की, “हो, आम्हाला याची जाणीव आहे. हा एक बुरशीजन्य आजार आहे. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये तो कोरोनापुर्वीदेखील आढळला होता. हा एक अत्यंत गंभीर रोग आहे. याचा संसर्गही घातक आहे. सध्या त्यावर उपचार करणे सोपे नाही.”(Corona may cause fungal infection can affect on eye light doctors claim)
भारतात 15 डिसेंबरच्या मागील 24 तासांत कोरोनाची एकूण 22,065 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह, देशातील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या वाढून 99,06,165 झाली आहे. एका दिवसात 354 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 1,43,709वर पोचली आहे. सध्या देशात एकूण 3,39,820 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात 34,477 लोक बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण 94,22,636 लोक या आजारातून बरे झाले आहेत.
(Corona may cause fungal infection can affect on eye light doctors claim)
कोरोनाला रोखण्याचे आव्हान, प्राण्यांनाही संसर्ग होत असल्याने खळबळhttps://t.co/6txfue8RMC#corona #CoronaVirusUpdates #Spain #Lions
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020