नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात नवीन कोरोना (Corona) प्रकरणांत 2.98 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,451 नवीन रुग्ण आढळून आले असून, देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,30,52,425 वर पोहोचली आहे. तर देशभरात कोरोनाचे 1,589 रूग्ण बरे झाले असून यासह भारतात आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या 4,25,16,068 आहे. यासोबतच देशात (India) कोरोनामुळे (कोविड मृत्यू) 54 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर एकूण मृतांची संख्या 5,22,116 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे, कोविड विरूद्ध देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 1,87,26,26,515 कोटी डोस देण्यात आले आहेत, तर त्यामध्ये गेल्या 24 तासात 18,03,558 डोस दिल्याची नोंद केली गेली आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या 14,241 होती तर रिकव्हरीचा (Recovery Rate) दर 98.75 टक्के होता.
देशात गुरुवारी 2380 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 56 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 53 वृद्धांचा मृत्यू केरळमध्ये झाला आहे. शुक्रवारी देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,30,52,425 झाली आहे. तर गुरुवारी कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13,433 होती. तर शुक्रवारी त्यात 808 ने वाढ झाली आहे. आणखी 54 मृत्यूंसह एकूण मृतांची संख्या 5,22,116 वर पोहोचली आहे.
देशातील काही राज्यांमध्ये, वाढत्या संसर्गादरम्यान ओमिक्रॉनचे एक नाही दोन नाही तर आठ नवीन प्रकार आढळून आले आहेत. यापैकी एक प्रकार देशाच्या राजधानीतही सापडला आहे. त्याची तपासणी INSACOG आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) शास्त्रज्ञांनी केली आहे. सध्या परदेश प्रवास करुन आलेले जे नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये हा संक्रमित प्रकार आढळून आला आहे.
गेल्या 24 तासांत दिल्लीत 935 नवे कोरोना रुग्ण आढळले असून सकारात्मकता दराबाबत बोलायचे झाले तर आता तो 4.71 टक्के झाला आहे. दिल्लीत सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या सुमारे 3000 झाली आहे, तर 1 रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. यावेळी लहान मुलांना याचा धोकाही वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्लीत बूस्टर डोस मोफत
दिल्ली सरकारकडून गुरुवारी बूस्टर डोस देण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत डोस दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, यामध्ये फक्त अशा लोकांनाच समाविष्ट केले जाणार आहे की, ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्याला 9 महिन्यांपेक्षा जास्त म्हणजे 39 आठवडे किंवा 273 दिवस झाले आहेत.
संबंधित बातम्या
Numerology | स्टाईल में रहने का… पैशाची उधळपट्टी आणि लक्झरी लाईफस्टाईल, तुमचाही शुभ अंक हाच आहे का?