मुंबई: काही देशांमध्ये आता कोरोनाची लस तयार झाली आहे.तर काही देशांमध्ये कोरोनाची लस देण्यासाठीही सुरुवात झाली आहे. आधी लस कुणाला देणार यासाठी काही देशांनी प्राधान्य निश्चित केले आहेत. जवळजवळ सर्व देशांमध्ये प्रथम 60 वर्षावरील म्हणजेच वडिलधाऱ्या माणसांना लस दिली जाणार आहे. दरम्यान आता लहान मुलांचं लसीकरण कधी होणार हा प्रश्न येतो.
या प्रश्नाचं उत्तर देताना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ.एके वर्षाणे म्हणालेत की ‘मुलांना लस दिली जाणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग खूप कमी प्रमाणात आढळला आहे.त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, या लसीची चाचणी लहानमुलांवर केली गेली नाहीये. त्यामुळे ही लस लहानग्यांना देण्याचा विचार करु नका.’ मात्र सरकारनं अद्याप यासंदर्भात कोणतेही मार्गदर्शक तत्त्वं जारी केलेले नाहीत. सध्या सरकारच्या प्राधान्य यादीत आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेमध्ये गुंतलेले लोक आणि वृद्ध यांचा समावेश आहे.
मास्क कधीपर्यंत वापरायचा ?
आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे मास्क कधीपर्यंत वापरायचा ?, या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर म्हणालेत की कोणत्याही रोगाला मुळापासून दूर करण्यासाठी किमान 70 टक्के लोकांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती असणं गरजेचं आहे. आपल्या शरिरात आजारी पडून रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल किंवा लसद्वारे. 70 टक्के लोकांचं लसीकरण होण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधीसुद्धा लागू शकतो. त्यामुळे सर्वांचं लसीकरण होईपर्यंत मास्क वापरावे लागतील.
अॅलर्जीचं काय करायचं ?
यूके सरकारनं लस देण्यास सुरवात केली आहे. हे सरकार फायझर कंपनीची लस देत आहे. मात्र काही लोकांमध्ये या लसीची अॅलर्जी पाहायला मिळाली. आता भारतातही लसीबाबतीत अशी समस्या उद्भवू शकते का आणि अशा परिस्थितीत लसीचे काय होईल असा प्रश्न आहे. यासाठी तज्ञ म्हणतात की ही काही गंभीर बाब नाही. लसीवर सहसा अशा अॅलर्जी होतात.यात काही घटक असतात ज्यामुळे खाज किंवा डोळ्यात जळजळ होऊ शकते.
फ़ाइज़र कंपनी ने कहा है कि जिन्हें एलर्जी है, उन्हें उनकी वैक्सीन नहीं दी जाए, इस पर क्या कहेंगे?@PrakashJavdekar @MIB_India @PIB_India @shashidigital #Unite2FightCorona pic.twitter.com/hyVh7f3JWe
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) December 11, 2020
लस कुठे आणि कशी ठेवली जाणार ?
फायझर या लसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसे ही लस मायनस 70 अंशांवर ठेवावी लागणार आहे आणि यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात, मात्र तज्ञ्यांचं म्हणणं आहे की भारतात अशी कोणतीही समस्या येणार नाही कारण कोल्ड चेन व्यवस्थापनात भारत खूप पुढे आहे.लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे डॉ. घनश्याम पांडे यांच्या म्हणण्यानुसार, कोल्ड चेन पोलिओ लसीमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावते. प्रत्येकाला माहित आहे की आपण जगातील सर्वात मोठ्या लसी उत्पादकांपैकी एक आहोत आणि कोल्ड चेन मॅनेजमेंटमध्येही आपण खूप पुढे आहोत.