नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराच्या (Corona New Strain) रुग्णांची संख्या आपल्या देशामध्ये वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत 58 व्यक्तींना नव्य कोरोनाची लागण झाली आहे. भारतातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी नव्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. (Corona Virus New Strain infected patient toll reaches to fifty eight in India)
कोरोनाच्या नव्या अवताराचे रुग्ण पहिल्यांदा ब्रिटनमध्ये समोर आढळले होते. पहिल्या कोरोना विषाणूपेक्षा हा विषाणू 70 टक्के जास्त धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले होते. सध्या नव्या कोरोनाचा संसर्ग जगातील 16 देशांमध्ये झाला आहे. भारतामध्ये 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत 33 हजार व्यक्ती भारतात आल्या होत्या. त्यापैकी 58 जणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर, या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
हेही वाचा: ब्रिटनमधून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या कोरोनाची लक्षणे, राजेश टोपेंच्या माहितीने धाकधूक
The total number of cases infected with the new strain of the novel Coronavirus first reported in the UK now stands at 58: Union Health Ministry pic.twitter.com/o9hadPPBrl
— ANI (@ANI) January 5, 2021
ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. नवा कोरोना आढळल्यानंतर ब्रिटनमधील लंडन आणि दक्षिण इंग्लंड भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. कोरोनाच्या नव्या अवतारामुळे ख्रिसमस आणि नवर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर मर्यादा आणल्या गेल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्गामुळे ब्रिटनमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केले आहे.
महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे 8 रुग्ण
कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
मुंबईकरांना दिलासा, मार्चनंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद
परवानगीनंतर मुंबईतील 4 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार
(Corona Virus New Strain infected patient toll reaches to fifty eight in India)