नवी दिल्ली – दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोनामुळे (Corona) चीनमध्ये पुन्हा हाहाकार उडाला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेकांचे बळी घेतले असून रोज हजारो रुग्णांना हॉस्पिटलमध्ये (patients are admitted in hospital) दाखल करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये चीनमधील 60 टक्क्यांहून अधिक आणि जगभरातील 10टक्क्यांहून अधिक लोक या संसर्गास बळी पडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनच्या बीए.5.2 आणि बीएफ.7 या व्हेरिएंटचा (new varient) सर्वाधिक कहर झाला आहे. अनेक लोकांना या व्हेरिएंटची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याशिवाय लाखो लोकांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त होत आहे.
काय आहेत नव्या व्हेरिएंटची लक्षणे ?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसारस कोविड19 च्या ओमिक्रॉनच्या बीए.5.2 आणि बीएफ.7 या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत आहे. या पार्श्भूमीवर काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये घशात संसर्ग होणे, अंगदुखी, हलका किंवा जास्त ताप अशी लक्षणे दिसून येत आहे.
दरम्यान चीनमधील परिस्थितीबाबत भारताला काळजी करण्याची गरज नाही, असे अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले. चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. पण भारताबाबत बोलायचे झाले तर येथे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या परिस्थितीत खूप फरक आहे.
अशी घ्या काळजी
वरिष्ठ तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मास्क घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क घालणे अजिबात विसरू नये. त्याशिवाय, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपायही शक्य आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आहारात कांदा, लसूण आणि लिंबू यांचा समावेश करावा, असे डॉक्टरांनी सांगितले. हे अँटी व्हायरल पदार्थ खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुरक्षित राहील, असे त्यांनी नमूद केले.
तसेच सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. मास्क लावावा, कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यावर अथवा बाहेर जाऊन आल्यावर वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, कुठेही थुंकू नये अशा गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. तसेच आहारात व्हिटॅमिन सी आणि झिंकचे प्रमाण वाढवावे. भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.