मुंबईच्या नायर रुग्णालयात लहान मुलांच्या कोरोना लसीच्या चाचणी प्रक्रियेला सुरुवात

| Updated on: Jul 12, 2021 | 4:26 PM

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांसाठीच्या कोरोनावरील लसीच्या चाचणी प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आहे. झायडस कॅडिलाने नायर रुग्णालयाला लस चाचणीसाठी परवानगी दिली आहे. (Corona Update)

मुंबईच्या नायर रुग्णालयात लहान मुलांच्या कोरोना लसीच्या चाचणी प्रक्रियेला सुरुवात
vaccine child
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांसाठीच्या कोरोनावरील लसीच्या चाचणी प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आहे. झायडस कॅडिलाने नायर रुग्णालयाला लस चाचणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या चाचणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (Covid-19 vaccine clinical trials in children in mumbai’s nair hospital)

नायरमध्ये आजपासून कोरोना लसीच्या चाचणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या लस चाचणीसाठी आज दोन मुलांची नोंद करण्यात आली आहे. या चाचणीत एकूण 50 मुलांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही लस लहान मुलांना दिली जाणार आहे. एकूण तीन डोस लहान मुलांना दिले जाणार आहेत. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 28 व्या तर तिसरा डोस 56 व्या दिवशी दिला जाईल, असं नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं.

मुलांना पाठवा

ज्या मुलांना सहव्याधी नाही आणि त्यांच्यात अँटिबॉडीज नाहीत, अशा मुलांना या चाचणीत सहभाग दिला जातोय. लस चाचणीत सहभागी होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पाठवावे, असे आवाहनही पालिकेने केलं आहे.

पुण्यातही चाचणी

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट याच महिन्यात लहान मुलांवरील कोव्होवॅक्सची क्लिनीकल चाचणी सुरु करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अमेरीकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने कोव्होवॅक्स ही कोव्हिडवरील लस तयार केली आहे. सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांवरील वयोगटासाठीही कोव्होवॅक्स लस बाजारात आणण्याची तयारी सीरम करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नोव्हाव्हॅक्सने सीरम इन्स्टिट्यूटसोबत NVX-CoV2373 या कोरोना लसीसाठी उत्पादन करार करण्याची घोषणा केली होती. ही लस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटवर प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. सिम्प्टमॅटिक कोव्हिड रोखण्यात 90 टक्के, तर मध्यम स्वरुपाची लक्षणे रोखण्यात ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला होता. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरवरुन नोव्हाव्हॅक्ससोबत भागीदारीविषयीची माहिती मार्च महिन्यात दिली होती. (Covid-19 vaccine clinical trials in children in mumbai’s nair hospital)

 

संबंधित बातम्या:

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; दरेकर यांची ठाकरे, दानवेंकडे मागणी

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोल्हापूर शहरातल्या लसीकरण केंद्रांवर गर्दीच गर्दी

(Covid-19 vaccine clinical trials in children in mumbai’s nair hospital)