तुमचा रक्तगट ‘हा’ आहे का ? मग वाचा ही कोरोनासंबंधीची गुड न्यूज

| Updated on: May 11, 2021 | 4:02 PM

काही विशिष्ट व्यक्तींना कोरोना होण्याची शक्यता नाही असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. Corona Health Blood Group

तुमचा रक्तगट हा आहे का ? मग वाचा ही कोरोनासंबंधीची गुड न्यूज
Blood
Follow us on

मुंबई: कोरोना कधी आणि कुणाला होईल काही सांगता येत नाही. तो बाधिताच्या संपर्कात आलेल्या कुणालाही कोरोना होतो, यात शंका नाही. वागण्या-करण्यात जराशी हयगय झाली की कोरोनाची लागण झालीच समजा. त्यामुळंच की काय आपल्याला कोरोना होईल या भीतीनं काही जण कोरोना नियमांचे काटेकोर पालन करताना दिसत आहेत. पण अनेक जण हलगर्जीपणा करतानाही दिसतायत. (CSIR survey report indicate people of o positive blood group have minimum risk of corona)

कोणता रक्तगट आहे सुरक्षित ?

काही विशिष्ट व्यक्तींना कोरोना होण्याची शक्यता नाही असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. या विशिष्ट व्यक्ती म्हणजे ओ रक्तगटाच्या..या रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची शक्यता खूप कमी असते. संसर्ग झालाच तरी तो खूप सौम्य आणि लक्षणविरहित असतो असं एका सर्वेसमध्ये समोर आलंय. हा सर्वेसुद्धा दुसरं-तिसरं कुणी नाही तर कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंटस्ट्रीयल रिसर्च अर्थात सीएसआयआरनं केलाय.

कसा केला सर्वे ?

हा सर्वे देशभरातल्या कोरोनाची लागण झालेल्या 10 हजार 427 रुग्णांवर केला गेला. या रुग्णांचे सारे तपशील आल्यानंतर त्याचा 40 विविध लॅबोरेटरीजमध्ये काम करत असलेल्या 140 डॉक्टरांनी व्यवस्थित अभ्यास केला, त्यात त्यांना ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेले रुग्ण सर्वात कमी आढळले. त्यावरुन हा निष्कर्ष काढण्यात आलाय.

सर्वाधिक धोका कोणत्या रक्तगटाला ?

एबी असलेल्या व्यक्तींना इतर रक्तगटांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचाही या अभ्यासात निष्कर्ष काढण्यात आलाय. बी रक्तगट असलेल्या व्यक्ती कोरोनाचा धोका असलेल्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनाही शाकाहारी व्यक्तींच्या तुलनेत अधिक धोका असल्याचं अभ्यासाअंती स्पष्ट झालंय. भाजीपाल्यांमध्ये असलेल्या अधिकाधिक फायबरमुळं शाकाहारी व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती मांसाहारींपेक्षा जास्त असल्यानं शाकाहारी कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित ठरत आहेत. कोरोना झालेल्या शाकाहारी व्यक्ती कोरोनानंतरच्या अनेक आजारांपासून सुरक्षित आहेत असंही या अभ्यासात दिसून आलंय.

धुम्रपान करणाऱ्यांना वरदान ?

धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींची फुफ्फुसं लवकर निकामी होतात असं सांगतात. पण धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी आहे असा निष्कर्ष यातून निघालाय. कोरोना हा श्वसनाचा विकार आहे. त्यामुळं धुम्रपान करणाऱ्यांत तयार होणारा म्युकोस संरक्षणासारखं काम करतो असं हा सर्वे म्हणतो. धुम्रपान आणि तंबाखूतल्या निकोटीनचा कोरोनाला रोखण्यात फायदा होतो का याचा बारकाईनं अभ्यास झाला पाहिजे अशी गरजही या सर्वेतून व्यक्त करण्यात आलीय. मात्र फ्रान्स, इटली, चीन आणि न्यूयॉर्कमधल्या अभ्यासांमध्येही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण कमी प्रमाणात होते असं दिसून आलंय. अमेरिकेतल्या सीडीसी या सरकारी संस्थेनं 7 हजार रुग्णांचा अभ्यास केला, त्यातले धुम्रपान करणारे खूप कमी होते. सीएसआयरनं अभ्यास केलेल्या 10,427 रुग्णांपैकी 1.3% टक्के लोकच धुम्रपान करणारे होते. म्हणजे बाधितांपैकी 98 टक्क्यांपेक्षा जास्त लोक धुम्रपान करत नव्हते. ब्रिटनच्या युसीएल या अकादमीच्या अभ्यासातही, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी धुम्रपान करणारे क्वचितच होते असं समोर आलंय.

डॉक्टर लोक काय म्हणतात ?

आग्र्याचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. अशोक शर्मा यांनी यासंबंधी बोलताना, “व्यक्तीच्या जेनेटिक स्ट्रक्चरवर सारं काही अवलंबून असतं” असं म्हंटलंय. थेलेसेमिया असणाऱ्या व्यक्तींना मलेरियाचा धोका खूप कमी असतो. तसंच एखाद्या कुटुंबात सर्वांनाच कोरोना होतो, पण एखाद्यालाच होत नाही. त्यामागं हे रक्तगटाचं कारण असावं असं डॉ. शर्मा म्हणाले. ओ गट असणाऱ्यांची कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती कदाचित चांगली असेलही, पण याचा अजून सखोल अभ्यास व्हायला हवा. सीएसआयरचा हा सर्वे पाहून ओ रक्तगटाच्या व्यक्तींनी कसंही वागावं आणि कोरोना नियम पाळू नये असा अजिबात अर्थ नाही. शक्यता कमी असली तरी त्यांनाही कोरोना होऊ शकतो असं डॉ शर्मा यांनी विस्ताराने सांगितलं.

सिनियर फिजीशियन डॉ. एस.के.कालरा यांनीही, हा नुसता सँपल सर्वे आहे. तो नीटपणे तपासलेला वैज्ञानिक अहवाल नाही असं म्हणत सावधानतेचा इशारा दिलाय. ओ रक्तगटाच्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते असं या अहवालाच्या आधारे म्हणणं घाईचं ठरेल असं डॉ. कालरा यांना वाटतं. 10 हजार रुग्णांऐवजी मोठ्या संख्येनं रुग्णांचा अभ्यास केला तर नवे तपशील समोर येऊ शकतील अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

डॉ. कालरा म्हणतात ते बरोबर आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्णांचा सखोल आणि वैज्ञानिक अभ्यास होत नाही, तोपर्यंत अशा कुठल्याही निष्कर्षांपर्यंत जाणं धाडसाचं ठरेल.

संबंधित बातम्या:

‘रक्तदान करा, एक किलो चिकन, पापलेट किंवा पनीर मोफत घेऊन जा’; रक्तदान वाढवण्यासाठी शिवसेनेचा फंडा!

Blood Pressure | ब्लड प्रेशर कधी तपासावं, कोणती काळजी घ्यावी?

(CSIR survey report indicate people of o positive blood group have minimum risk of corona)