मुंबई | 11 जानेवारी 2024 : हिवाळ्यात आपल्या शरीरावर थंड हवामानाचा अनेक प्रकारे परिणाम होऊन बदल होतात. त्यामुळे आपल्या आहारात आपल्याला बदल करावा लागतो. पारा सातत्याने घसरल्याने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आपल्या जसे गरम कपडे घालण्याची गरज असते. तसेच आपल्या आहार देखील काही अन्नपदार्थांचा समावेश करण्याची गरज असते. खजूर असा पदार्थ आहे ज्याचा आहारात समावेश केल्याने आपले आरोग्य सुधारते.
हिवाळ्यात अनेक पदार्थ आपल्या शरीरात उष्णता तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे थंडीच्या मोसमात आपल्या हेल्थी रहाण्यास हे पदार्थ मदत करीत असतात. खजूर हे एक सुपरफूड आहे. थंडीच्या मोसमात त्याचा आहारात समावेश करणे चांगले असते.याचा आहारात समावेश केल्याने खूपच फायदे मिळतात. चला पाहूयात खजूराचा थंडीच्या मोसमात आहारात समावेश करण्याचे फायदे काय मिळतात ?
थंडीच्या महिन्यात आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वत:ला थंडीपासून वाचविणे गरजेचे असते. अशात जर खजूराचा समावेश आहारात केला तर आपल्या शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत मिळते. या मोसमात खजूर खाल्ल्याने शरीरात उष्णता तयार होते.
थंडीच्या मोसमात नेहमीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आपल्या सहज अनेक आजाराला बळी पडावे लागते. त्यावेळी खजूर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. आणि हिवाळ्यात होणाऱ्या आजारापासून वाचण्यास मदत होते. खजूरातील कॅरोटीनॉयड, फ्लेवोनोइड आणि फेनोलिक एसिड सारखे एंटीऑक्सीडेंट सूज कमी करायला मदत करते आणि शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढतात.
हिवाळ्यात पाचनसंस्था बिघडते. त्यामुळे अशात जर खजूर खाल्ले तर त्यातील हाय फायबर कंटेंट पचन संस्थेचे आरोग्य सुधारते. आणि बद्धकोष्टतेपासून सुटका होते. तसेच रोज पोट साफ करण्यास देखील त्यामुळे मदत होते.
खजूरात नैसर्गिक शर्करा असते. विशेष रुपाने फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यात असल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. आणि हिवाळ्याच्या महिन्यात खजूराचा आहारात समावेश केल्याने आपल्या एनर्जी मिळते.
खजूर व्हिटामिन्स क आणि व्हिटामिन्स बी 6 सारखे आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज आणि कॉपर सारख्या मिनरलची भरपूर मात्रा असते. ही पोषक तत्वे हिवाळ्यात आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.