नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’नं (DGCI) आणखी एका औषधाला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. शनिवारी याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’नं (DGCI) मंजुरी दिलेल्या औषधाचे नाव 2-deoxy-D-glucose (2-DG) असे आहे. (DCGI gives emergency approval of DRDO-developed anti-Covid oral drug)
डीआरडीओच्या ‘इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्रित हे औषध तयार केलं आहे. या औषधाला सध्या ‘2 डीजी’ (2 deoxy D Glucose) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आली आहे.
‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’नं (DGCI) मंजुरी दिलेले हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी ठरलं आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला ते लवकरात लवकर आजारातून बरे झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सोबतच रुग्णांची ऑक्सिजनची गरजची या औषधामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं आढळून आलं.
2-DG हे औषध कोरोना संसर्गामुळे ग्रस्त झालेल्या सेल्सपर्यंत पोहोचते. त्याठिकाणी होणाऱ्या विषाणूजन्य संश्लेषण आणि उर्जा उत्पादनाची प्रक्रिया थांबवते. कोरोनाचा थेट संसर्ग असलेल्या पेशींवर कार्य केल्यामुळे हे औषध सर्वात विशेष, वेगळे आणि प्रभावी होते.
या औषधाचा वापर करणाऱ्या कोरोना रुग्णांवर इतर करोनाबाधित रुग्णांपेक्षा कमी वेळेत परिणाम दिसून येत आहे. या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. त्यामुळे ते लवकर बरे होत आहेत. विशेष म्हणजे हे औषध घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना मेडिकल ऑक्सिजनाचा सपोर्टवरुन हटवण्यात आले आहेत. तसेच त्यांचा प्रतिसाद चांगला झाला आहे. तर ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले नाही. त्यांना तुलनेने जास्त दिवस ऑक्सिजनचा आधार द्यावा लागला आहे.
डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल 2020 मध्ये लॅबमध्ये या औषधाचा प्रयोग केला होता. कोरोना विषाणूचं सक्रमण रोखण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं. याच आधारावर ‘डीसीजीआय’नं मे 2020 मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली होती.
2 डीजी हे औषध पावडरच्या स्वरुपात मिळते. हे औषध त्याला पाण्यात मिसळून रुग्णाला दिलं जातं. हे औषध संक्रमित पेशींत जमा होतं. त्यामुळे विषाणूचं वाढतं संक्रमण रोखण्यात त्याचा उपयोग होतो. रुग्णांच्या शरीरातील संक्रमित पेशी शोधून काढून विषाणूला आळा घालण्यासाठी हे औषध उपयोगी ठरतं. या औषधामुळे रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम होऊ शकतो.
महाराष्ट्रातही ट्रायल
देशभरातील अनेक रुग्णालयांत या औषधाची दुसरी ट्रायल पार पडली. ट्रायलसाठी 11 रुग्णालयांतील 110 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. मे ते ऑक्टोबर महिन्यात ही ट्रायल पार पडली. तिसऱ्या टप्पा डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत देशातील 27 रुग्णालयांत पार पडला. यात 220 रुग्णांचा समावेश करण्यात आला.
यात ज्या रुग्णांवर ‘2 डीजी’ या औषधाचा वापर करण्यात आला. त्यातील 42 टक्के रुग्णांची ऑक्सिजनवरच अवलंबित्व तिसऱ्या दिवशी संपुष्टात आलं. ही ट्रायल महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये करण्यात आली. (DCGI gives emergency approval of DRDO-developed anti-Covid oral drug)
संबंधित बातम्या :
ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्यासाठी रणनीती ठरणार, सर्वोच्च न्यायालयाकडून नॅशनल टास्क फोर्सची स्थापना