Health: डिप्रेशनमुळे वाढू शकतो हृदयाशी संबंधित आजारांचा धोका, स्वीकारा ‘ हे ‘ हेल्दी रुटीन !

| Updated on: Sep 07, 2022 | 5:21 PM

तणाव आणि डिप्रेशन (नैराश्य) हे हृदयाशी संबंधित आजाराचे सर्वात मोठे कारण आहे. ऑफीसमधील वर्कलोड, नात्यांमधील तणाव आणि आर्थिक परिस्थिती यामुळे मानसिक ताण वाढत आहे. बराच काळ डिप्रेशन आल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

Health: डिप्रेशनमुळे वाढू शकतो हृदयाशी संबंधित आजारांचा धोका, स्वीकारा  हे  हेल्दी रुटीन !
डिप्रेशन
Image Credit source: Social Media
Follow us on

शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी हृदय (Heart) निरोगी आणि स्वस्थ राहणे खूप गरजेचं आहे, कारण हृदय 24 तास काम करत असतं. असंतुलित जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. तणाव आणि डिप्रेशन (नैराश्य) (Stress and Depression) हे हृदयाशी संबंधित आजाराचे सर्वात मोठे कारण आहे. ऑफीसमधील कामाचे प्रेशर, नात्यांमधील तणाव आणि आर्थिक परिस्थिती यामुळे मानसिक ताण (Mental Pressure) वाढत आहे. बराच काळ डिप्रेशन आल्यामुळे हृदयाशी संबंधित आजार (Heart Problem) होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, निरोगी दिनचर्या असेल तर डिप्रेशन (नैराश्य) किंवा तणाव कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत मिळते. रोजच्या जीवनशैलीत बदल करून, नैराश्यावर कशी मात करता येईल, हे जाणून घेऊया.

 

सकस आणि पौष्टिक आहार –

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, जीवनशैलीत बदल केल्याने निरोगी व तंदुरुस्त मन आणि शरीर मिळू शकतं. यामुळे डिप्रेशनची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. सकस, पौष्टिक आहार शरीरासाठी चांगला असतो आणि त्यामुळे मूड सुधारण्यासही मदत होते. आहार सुधारण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे जंक फूडपासून दूर राहणे. हाय रिफाईंड साखर आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पॅकबंद पदार्थ खाणे टाळावे. ओमेगा ३ एस आणि ओमेगा 6 एस सारखे हेल्दी फॅटी ॲसिड्स वाढवा. त्यासाठी मासे, सुकामेवा, नट्स , ताजी फळं, भाज्या आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करता येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

व्यायाम –

व्यायाम केल्याने शरीरात नैसर्गिक ॲंटी-डिप्रेसंट्सचे उत्पादन वाढते. आठवड्यातून 3 ते 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम केल्याने डिप्रेशन दूर करता येऊ शकतो. व्यायाम केल्याने तणाव कमी होतो, मूड सुधारतो तसेच आत्मसन्मान वाढण्यासही मदत होते.

मेडिटेशन –

मेडिटेशन किंवा ध्यान करणे, हे मानसिक व्यायाम करण्याचा उत्तम उपाय आहे. दीर्घ श्वसन अथवा मंत्रांचा पुनरुच्चार केल्याने विविध फायदे मिळू शकतात. मेडिटेशन केल्याने तणाव दूर होतो आणि शरीर व मन रिलॅक्स होते. डिप्रेशनमुळे बऱ्याच वेळेस नीट झोप लागत नाही. अशा परिस्थितीत मन शांत व्हावे आणि चांगली झोप लागावी यासाठी दीर्घ श्वसनाचा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. या सवयींचा अवलंब करून निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास डिप्रेशन व तणाव कमी होऊ शकतो व निरोगी आयुष्य जगता येऊ शकते.