हल्लीच्या काळात कुणालाही डायबिटीज हा आजार होताना दिसत आहे. खासकरून शहरी लोकांमध्ये डायबिटीजचं प्रमाण अधिक आहे. त्यातही 30 वर्षापासूनच्या पुढच्या वयोगटातील लोकांना डायबिटीज वेगाने होताना दिसत आहे. खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणं, लाइफस्टाईलची ऐशीतैशी, मानसिक तणाव आदी कारणामुळे डायबिटीज होत असतो. पण अपुऱ्या झोपेमुळेही डायबिटीज होतो हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही सहा तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता अनेकपटीने असते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्यावर भर द्या.
शरीरात गरजेप्रमाणे इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे शुगर लेव्हल वाढते. परिणामी डायबिटीज होतो. हा आजार जेनेटिक कारणानेही होतो. त्याला टाइप-1 डायबिटीज म्हटलं जातं. जेव्हा खाण्यापिण्याची पथ्य पाळली जात नाही, लाइफस्टाईल बिघडतं तेव्हा हा आजार होतो. त्याला टाइप 2 म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात टाइप-2 च्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. झोपेचा खराब पॅटर्न हे त्याचं मुख्य कारण आहे. मेडिकल जर्नल द नेचरने एक रिसर्च प्रकाशित केला आहे. त्यात सहा तास झोप न घेतल्यास डायबिटीजचा धोका अनेकपटीने वाढू शकतो, असं म्हटलं आहे.
जीटीबी हॉस्पिटल मेडिसिन विभागाचे डॉ. अजित कुमार यांनी यावर प्रकाश टाकला आहे. नीद आणि डायबिटीजचा अत्यंत निकटचा संबंध आहे. झोपेच्या बिघडलेल्या पॅटर्नमुळे डायबिटीज होतो. जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही तेव्हा इन्सुलिन्स रसिस्टेन्स होतो. त्यामुळे ब्लड शुगरचं प्रमाण वाढतं. झोपेच्या अभावामुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनची लेव्हल वाढते. या हॉर्मोनची लेव्हल वाढल्याने त्याचा थेट परिणाम ब्लड शुगरवर होतो. त्यामुळे ब्लड शुगर वााढतो. ही समस्या दीर्घकाळ राहते. त्यामुळे डायबिटीज होतो, असं अजित कुमार यांचं म्हणणं आहे.
ज्या कुटुंबातील कुणालाही यापूर्वी डायबिटीज असेल, ज्यांचं वजन वाढलं असेल आणि ज्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा नियमित नसतील अशा लोकांना डायबिटीजचा धोका सर्वाधिक असतो. स्थुलतेचा संबंधही डायबिटीजशी असतो. अनेकदा तर शरीराचं वाढलेलं फॅटही डायबिटीजला कारणीभूत ठरलं आहे. द लँसटच्या रिसर्चनुसार, वाढलेल्या बीएमआयमुळे डायबिटीज होण्याची शक्यता अधिक असते. ही शक्यता तीनपट असते. त्यामुळेच स्थुल असलेले लोक डायबिटीजचे शिकार झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जे लोक दीर्घकाळापासून पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांना डायबिटीजचा धोका अधिक असतो.
रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करा
रात्री फोन किंवा लॅपटॉपवर राहू नका
रात्री चहा किंवा कॉफी पिऊ नका
झोपण्याची वेळ ठरवा
रोज किमान सात ते आठ तास झोप घ्या