Diabetes warning signs: हातावर दिसतात मधुमेहाची लक्षणे, तुम्हालाही होतोय का हा त्रास?

| Updated on: Sep 13, 2022 | 11:12 AM

एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीला मधुमेह म्हणजेच डायबिटीस झाला असेल तर त्याची लक्षणे हातावर दिसून येतात. कोणाला याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आपले हात आणि नखांवर दिसणारी काही लक्षणे तपासून पहावीत.

Diabetes warning signs: हातावर दिसतात मधुमेहाची लक्षणे, तुम्हालाही होतोय का हा त्रास?
मधुमेह
Image Credit source: Social Media
Follow us on

मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या (Diabetes) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खराब दिनचर्या, लाइफस्टाईल आणि वाढलेले वजन (bad lifestyle, weight gain) ही मधुमेह होण्याची मुख्य कारणे आहेत. मधुमेहाचे दोन प्रकार असतात, टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादन बिलकुल होत नाही. तर टाइप २ मधुमेहामध्ये (type 2 diabetes) स्वादुपिंडातून इन्सुलिनचे कमी प्रमाणात उत्पादन होते. ज्या लोकांना मधुमेह असतो, त्यापैकी 90 टक्के व्यक्तींना टाइप २ मधुमेह असतो. वेळेवरच त्याची लक्षणे ओळखली तर मधुमेहाचा इलाज लवकर सुरू होऊ शकतो, तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मधुमेहाची काही लक्षणे (warning signs of Diabetes) दिसून येतात, ज्याद्वारे या आजाराबद्दल ओळखता येऊ शकते. मधुमेहाची काही लक्षणे हातावर दिसून येतात, ती कोणती हे जाणून घेऊया.

अभ्यासातून झाला खुलासा –

Wiley Clinical healthcare Hub यांच्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीला मधुमेह म्हणजेच डायबिटीस झाला असेल तर त्याची लक्षणे हातावर दिसून येतात. ज्या व्यक्तीला मधुमेह झाला असेल तर त्यांच्या नखांच्या आसपसची त्वचा लाल होते. त्यामुळे तुम्ही तुमची नखं व त्यांच्या आसपासची त्वचा याकडे लक्ष दिले पाहिजे. जर तिथून रक्त येत असेल किंवा फोड येत असतील, तर हेही मधुमेहाचे लक्षण असू शकते.

नखांजवळ सर्क्युलेशन न झाल्याने नख इतर टिश्यूजप्रमाणे डेड होतात. त्याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांच्या पायांच्या बोटांवरही अशी लक्षणे दिसून येतात. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ऑन्कोमायकोसिस म्हणून ओळखले जाणारे बुरशीजन्य संक्रमण अथवा संसर्ग जास्त होतो, त्यामुळे पायांच्या बोटांवरही काही लक्षणे दिसून येतात. तुमच्या बाबतीतही अशी परिस्थिती उद्भवली असेल तर तुमची नखं पिवळी पडतील आणि तुटण्याची शक्यता असेल.

हे सुद्धा वाचा

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार (NHS), जर तुम्हाला टाइप 2 मधुमेह झाला असेल तर तुम्हाला रात्री बऱ्याच वेळेस लघवीला जावे लागेल. तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे हे होऊ शकते.
मात्र एखाद्या व्यक्तीला खूप तहान लागत असेल आणि वारंवार लघवीला जावे लागत असेल तर शरीर डिहायड्रेट होऊ शकते. यामुळे सतत थकवा जाणवू शकतो. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवू शकते. वाढते वय आणि वाढलेले वजन यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, असे एनएचएसने नमूद केले आहे.

 

आहाराकडे द्यावे लक्ष –

 

मँचेस्टर विद्यापीठाच्या विश्लेषणानुसार इंग्लंडमध्ये टाइप 2 मधुमेहाच्या आजारात 2018 ते 2019 या कालावधीत 7 टक्क्यांनी घट झाली होती. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण त्यांना त्यांची ग्लुकोजची पातळी सामान्य राखणे आवश्यक असते. नॅशनल हेल्थ सर्व्हिस नुसार, रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढल्यास डायबिटीस कीटोॲसिडोसिस (KDA) सारखी जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.

 

टाइप २ मधुमेहाची प्रमुख लक्षणे –

 

  1.  सामान्य प्रमाणापेक्षा जास्त लघवी होणे.
  2. वारंवार तहान लागणे
  3. खूप थकल्यासारखे वाटणे
  4. अचानक वजन कमी होणे
  5. खासगी भागांवळ खाज सुटणे.
  6. जखम भरायला वेळ लागणे
  7. अंधुक दिसणे / स्पष्ट न दिसणे

 

यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तुम्हालाही मधुमेहाचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )