मधुमेह असलेल्या रुग्णांनी पायाचा संसर्ग टाळण्यासाठी हिवाळ्यात ‘या’ टिप्स करा फॉलो

| Updated on: Dec 24, 2024 | 4:16 PM

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना जखमांकडे विशेष लक्ष देणे गरजेचं असतं, कारण अश्याने त्या लोकांना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्याचबरोबर हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने ही समस्या आणखी वाढू शकते, त्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी पायाचा संसर्ग टाळण्यासाठी हिवाळ्यात या टिप्स करा फॉलो
Follow us on

हिवाळ्यात बहुतांश लोकांना थंड हवामानामुळे कोरड्या त्वचेची समस्या उद्भवू लागते. सर्वात मोठी समस्या म्हणजे पायाच्या टाचांना भेगा पडणे. या काळात मधुमेह असलेल्या रुग्णांनी सर्वात जास्त काळजी घेणे आवश्यक असते, कारण मधुमेही रुग्णांना जखम झाल्यावर संसर्ग होण्याची भीती अधिक असते. याशिवाय मधुमेह असलेल्या व्यक्तींना पायाचे अल्सर होण्याची शक्यता जास्त असते आणि अशा वेळी कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा, अन्यथा समस्या लक्षणीय वाढण्याची शक्यता असते. सध्या मधुमेहींनी हिवाळ्यात पायाचा संसर्ग टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत.

ज्या लोकांना मधुमेह अधिक प्रमाणात झालेला आहे. आणि त्याच्या शरीरातील रक्तातील साखर अधिक आहे किंवा वजन जास्त आहे अश्या मधुमेही लोकांमध्ये पायाच्या अल्सरचा धोका जास्त असतो, मधुमेहींमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरते व्यतिरिक्त पायाच्या अल्सरची शक्यता देखील वाढते. कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास इन्फेक्शन टाळणे खूप महत्वाचे आहे, तर चला जाणून घेऊया मधुमेही लोकांनी हिवाळ्यात त्याच्या पायांची काळजी कशी घ्यावी.

पाय स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या

पाय नियमित स्वच्छ करण्याबरोबरच बाहेरून आला असाल तर लगेच पाय स्वच्छ करावेत जेणेकरून संसर्ग वाढवणारे धुळीचे कण आणि बॅक्टेरिया दूर होतील, याची विशेष काळजी घ्या.

मॉइश्चरायझ करायला विसरू नका

बाहेरून आल्यावर किंवा पाय धुतल्यानंतर टॉवेलने नीट पुसून घ्या, विशेषत: अंगठ्याच्या आणि बोटांच्या भागात असलेल्या जागेत लक्ष द्या. कारण या ठिकाणी ओलावा तसाच राहतो. यानंतर ज्या ठिकाणी अधिक संसर्ग होण्याची भीती असते अशा ठिकाणी कापसामध्ये थोडी सर्जिकल स्पिरीट लावा. तसेच पायांना मॉइश्चरायझ करायला विसरू नका. रात्री झोपण्याआधीही थोड्या तेलाने पायांना हलकेच मसाज करा. यामुळे त्वचा ओलसर होईल आणि तुम्हाला चांगली झोपही मिळेल. त्यामुळे थंडीच्याबी दिवसात पायांच्या टाचांना भेगा पडणार नाही. तुमचे पाय निरोगी राहतील.

हायझीनची काळजी घ्या

संसर्ग टाळण्यासाठी हायझीनची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. थंडीत पायांच्या टाचांना भेगा पडतं असतील किंवा पायाच्या तळव्याला जखम झाली असेल तर अनवाणी फिरू नका, याशिवाय चप्पलशिवाय चालणे टाळावे. वेळोवेळी पायाच्या बोटांची नखे कापत रहा जेणेकरून घाण जमा होणार नाही. नखे कापताना काळजी घ्या जेणेकरून कोणतीही जखम होणार नाही. नखे कापल्या नंतर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी फक्त एक दिवस मोजे घाला आणि पाय स्वच्छ करा.

त्वचेवर उपचार करा

थंडीमुळे पायांची त्वचा कोरडी होऊन कडक होते यासाठी तेव्हा मुलायम करण्यासाठी आठवड्यातून दोनदा पाय १५ मिनिटे गरम पाण्यात ठेवावेत. या पाण्यात थोडा शॅम्पू आणि लिंबाचा रस घाला. काही वेळाने त्वचा मऊ झाल्यावर प्युमिक स्टोनने त्वचा काढून टाका. त्याबरोबर हेही लक्षात ठेवा की, जिथे तुम्हाला वेदना जाणवतात तेव्हा जोर लावून त्वचा काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर पाय स्वच्छ करून पायाला नारळ तेल, ऑलिव्ह किंवा बदामाचे तेल लावावे. त्यामुळे तुमच्या पायांची त्वचाही मुलायम होईल आणि इन्फेक्शनची भीती राहणार नाही.

रोज पायाचा व्यायाम करा

नियमित व्यायाम करणे प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही रोज काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर जायलाच हवं. याशिवाय पायांचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी जॉगिंग, चालणे, दररोज किमान तीस मिनिटे खुर्चीवर बसून पाय जमिनीवर ठेवून बोटे उंचावून नंतर सरळ जमिनीवर टेकवावे, असे वारंवार करावे. हे व्यायाम केल्याने खूप फायदा होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)