क्षयरोग : धडकी भरणाऱ्या आजाराचे वेळीच निदान हाच सर्वात मोठा उपचार

| Updated on: Feb 24, 2022 | 5:13 AM

क्षयरोग अर्थात टीबी, नुसते नाव ऐकले तरी आजही धडकी भरते. याला कारणही तसेच आहे. हा एक जिवाणूजन्य आजार असून हा रोग दुर्धर समजला जात होता. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः 75% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते.

क्षयरोग : धडकी भरणाऱ्या आजाराचे वेळीच निदान हाच सर्वात मोठा उपचार
क्षयरोगाची लक्षणे
Follow us on

मुंबई : क्षयरोग अर्थात टीबी, नुसते नाव ऐकले तरी आजही धडकी भरते. याला कारणही तसेच आहे. हा एक जिवाणूजन्य आजार असून हा रोग दुर्धर समजला जात होता. हा आजार (‘Mycobacteria’ bacteria) ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला (Tuberculosis) क्षयरोग होतो. यात मुख्यतः 75% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण: 35 टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात (Tuberculosis germs) क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. या रोगामुळे मृत्यूच्या प्रमाणाचा विचार केला तर एड्सनंतर याचे सर्वात घातक इन्फेक्शन मानले जात होते. पण आता काळाच्या ओघात वेळीच निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकते हे सिध्द झाले आहे. मात्र, प्रतिकार शक्ती

क्षयरोगाचे दोन प्रकार

क्षयरोगाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सुप्त आणि दुसरा सक्रिय क्षयरोग. सुप्त टीबीमध्ये जीवाणू हे शांत असतात. त्यामुळे त्याची लक्षणे हे दिसून येत नाहीत. यामुळे जगात एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक हे क्षयरोगाच्या विळख्यात असतानाही केवळ ते सुप्त प्रकारात असल्याने समोर येत नाहीत तर दुसरा प्रकारचा जीवाणू हा अॅक्टीव म्हणजेच सक्रीय असतो. सुप्त अवस्थेतून सक्रीय टीबीमध्ये रुपांतर होण्याचे प्रमाण हे 10 टक्के एवढे आहे. सक्रीय टीबीमध्ये प्रतिकारशक्ती ही जीवाणूला रोखू शकत नाही. परिणामी व्यक्ती आजारी पडतो व वेळीच उपचार न झाल्यास हा टीबी प्राणघातकही होऊ शकतो.

ही आहेत क्षयरोगाची लक्षणे

एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, दरम्यान वजन कमी होणे, भूक कमी होणे, रात्रीच्या वेळी बारीक ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे असे आढळून आल्यास त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. यामध्ये हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते.

क्षयरोग पसरतो कसा?

हा एक संसर्गजन्य आजार आहे. खोकल्यातून किंवा शिंकण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत याचा प्रसार होतो. धूम्रपान करणाऱ्यांना, मधुमेह किंवा एचआयव्ही, एड्सबाधिताना सक्रिय टीबी होतो. सर्वाधिक धोका मधुमेही, एचआयव्हीबाधितांना क्षयरोग रुग्णाच्या संपर्कात येणारा मधुमेहींना, एचआयव्हीबाधितांसह कुपोषिताना, स्टेरॉईड्स घेणाऱ्यांना, दारूचे व्यसन असणाºयांना या रोगाचा धोका जास्त असतो. वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका आणि डॉक्टरांनाही याचा धोका संभवतो.

रोगाचे निदान अन् उपचारपध्दती

दोन आठवडयापेक्षा जास्‍त दिवस खोकला असणा-या व्‍यक्‍तीची थुंकी सुक्ष्‍मदर्शक यंत्राखाली तपासुन या आजाराचे निदान करता येते. काही रुग्‍णांमध्‍ये ‘क्ष’ किरण तपासणी, प्रयोगशाळेत कल्‍चर तपासणी व इतर अधुनिक चाचण्‍यांद्वारे करता येते. मात्र, थुंकी तपासणी ही सोपी, सरळ, स्‍वस्‍त आणि सर्वत्र् उपलब्‍ध असणारी पध्‍दती आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बीबीजी लसीकरण, आरोग्य शिक्षण तसेच क्षयरोगाचा उपचार सुधारीत राष्‍ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्‍यक्‍तींना रुग्‍णनिहाय औषधी पॅकमध्‍ये उपलब्‍ध आहे.

संबंधित बातम्या :

मळमळ, मूड स्विंग आणि बरंच काही, गरोदरपणातील समस्यांवर सात घरगुती उपाय

Health care : रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी दररोज चॉकलेटचा 1 तुकडा नक्की खा, वाचा अत्यंत महत्वाची माहिती!

मुलाच्या वजन-उंचीमुळे तुम्ही त्रासले आहात? 6 पदार्थ तुमची चिंता करतील दूर