मुंबईः सुर्यास्तनंतर अर्थात संध्याकाळी 7 नंतर न खाणे हे एक आहार शास्त्रातील मानव हिताचे (human interest)नियेाजन आहे. ज्याला इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting) म्हणतात. याला ८ तासांच्या उपवासाच्या नावानेही ओळखले जाते. यात आपण सामान्यपणे जे काही खातो ते ११ ते ७ या वेळातच खातो. सायंकाळी सातनंतर काहीही न खाने आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. व्यस्त जीवनशैलीमुळे आपण सायंकाळी चमचमीत पदार्थ खातो. पंरतु, त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम (Bad results) होतो. जसे की, पास्ता मध्ये असलेले कार्बोहायड्रेट आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु ते रात्रीच्या वेळी टाळले पाहिजेत. असे काही चमचमीत पदार्थ तुम्ही रोज खात असाल, आणि व्यायाम करत नसाल, तर ही साखर तुमच्या शरीरातील फॅटमध्ये बदलते आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.
चीज-
चीज फक्त साखरेचे चयापचय करते आणि रक्तातील साखर आणि इन्सुलिन वाढवते. ते नुकसान देय आहे कारण ते उर्जेसाठी वापरले जात नाही आणि शरीरात चरबीच्या रूपात राहते.
आइस्क्रीम
दुधाचे पदार्थ तुमचे पोट खराब करू शकतात. जरी तुमची दुग्धजन्य पदार्थांशी वैर नसले तरीही, विशेषतः रात्रीच्या वेळी, आइस्क्रीम खाणे अयेाग्य आहार गणला गेला आहे. जड असण्या सोबतच ते चरबीने भरलेले असते, जे तुमच्या पोटात साठते.
बर्गर
बर्गर खाल्ल्याने तुमच्या जिभेला चव येईल हे खरं, पण दीर्घकाळात ते नुकसानच करू शकते. विशेषतः जर तुम्ही ते रात्री खाल्ले तर ते तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक चे नुकसान करते.
दारू
अल्कोहोल हे एक विष आहे, जे तुमच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते. दररोज संध्याकाळी किंवा रात्री मद्यपान केल्याने कॉर्टिसॉल, एक प्राणघातक तणाव वाढवणारे संप्रेरक शरीरात स्त्रवते. हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. ज्यामुळे चिंता आणि घबराट वाढू शकते.
चॉकलेट
चॉकलेट त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे, हे जगभरात लोकप्रिय डेझर्ट आहे. तथापि, रात्री खाल्ल्याने तुमची झोप खराब होऊ शकते, कारण त्यात कॅफिनचे प्रमाण जास्त प्रमाणे असते.
कोबी
कोबी आणि ब्रोकोलीसारख्या क्रूसीफेरस भाज्या संध्याकाळी खाल्ल्या तर पचायला जड जातात. जेव्हा त्यांचा मोठ्या आतड्यांमध्ये प्रवेश होतो. तेव्हा तेथे उपस्थित बॅक्टेरिया अन्न घटक आंबवण्याची प्रक्रिया सुरू करतात, ज्यामुळे फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवते.
संध्याकाळी ६ नंतर ब्रेड खाऊ नये. कारण त्यात फक्त कार्बोहायड्रेट आणि साखर असते. मैद्यापासून तयार होणाऱ्या ब्रेडला तयार करण्यापूर्वीच फुगवण्याच्या प्रक्रियेसाठी ईस्ट लावले जाते. त्यानंतर शेकल्या नंतर ते, खायला दिले जाते. तेच आपण रात्री खाल्यास पेाटफुगी सारखा त्रास होऊ शकतो. हे ब्रेड मोठ्या आतड्यात जाऊन नंतर परत त्याची सडण्याची प्रक्रिया सुरु होते.जी, पोटाच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरते.