MRI आणि CT Scan मध्ये अंतर काय? दोन्ही मशीनमधील टेस्टची जोखीमही जाणून घ्या

| Updated on: May 14, 2021 | 10:59 PM

MRI आणि CT-Scan मशीन दिसायला एकसारख्या असतात. त्याचं कामंही एकसारखंच असतं. पण वास्तवात या दोन्ही मशीनचं काम वेगळं आहे.

MRI आणि CT Scan मध्ये अंतर काय? दोन्ही मशीनमधील टेस्टची जोखीमही जाणून घ्या
MRI machine
Follow us on

मुंबई : एमआरआय मशीन (MRI- Magnetic Resonance Imaging) आपल्या शरिराच्या आताली भागांची चित्र घेते आणि कुठली समस्या असेल तर त्याद्वारे त्याची माहिती मिळू शकते. या प्रमाणे सिटी स्कॅन मशीनही (CT Scan- Computed Tomography) काम करतं. MRI आणि CT-Scan मशीन दिसायला एकसारख्या असतात. त्याचं कामंही एकसारखंच असतं. पण वास्तवात या दोन्ही मशीनचं काम वेगळं आहे. MRI मशीनमधून CT-Scan केला जाऊ शकत नाही आणि CT-Scan मशीनद्वारे MRI केला जाऊ शकत नाही. MRI मशीन मुख्यत्वेकरुन गुडघे, डोके, पंजा, छाती, हृदय आणि रक्त वाहिन्या तपासण्यासाठी केला जातो. तर CT-Scan मशीन हाडांचे फ्रॅक्चर, ट्यूमर, कॅन्सर, इंटरनल ब्लिडिंग आदी बाबींचा तपास केला जातो. (Difference between MRI and CT-Scan Machine)

MRI आणि CT Scan मधील सर्वात मोठं अंतर

MRI आणि CT Scan मशीन दिसायला एकसारखी असते. त्यांची काम करण्याची पद्धतही जवळपास एकसारखीच आहे. असं असलं तरी या दोन्ही मशीनमध्ये एक मोठं अंतर असतं. MRI मशीन रेडिओ लहरीद्वारे काम करते, तर CT-Scan मशीन एक्स-रे द्वारे काम करते. कोणत्याही प्रकारच्या तपासणीसाठी या दोन्ही प्रक्रिया कमी जोखमीच्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीत या दोन्ही मशीन आपल्या कामात सर्वश्रेष्ठ आहेत. MRI मशीनचा आवाज मोठा येतो. त्यामुळे रुग्णाला हेडफोन किंवा ईयर प्लग दिले जातात. MRI मशीनच्या तुलनेत CT-Scan मशीनचा मोठा आवाज येत नाही.

काही बाबतीत MRI आणि CT Scan टेस्टची जोखीम

जगभरात MRI च्या तुलनेत CT-Scan मोठ्या प्रमाणात केला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे MRI हा CT-Scan पेक्षा जास्त महाग असतो. अनेक प्रकरणात या मशीन्सचा वापर धोक्याचा ठरु शकतो. MRI मशीनमध्ये चुंबकीय शक्ती असते. त्यामुळे धातूच्या संपर्कात आल्यास ते धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे MRI करण्यापूर्वी रुग्णाला अंगावरील सर्व दागिने, लोखंडी, स्टिलच्या वस्तू काढण्यास सांगितलं जातं. तर CT-Scan हा गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरु शकतो. कारण, यामुळे पोटातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. इतकच नाही तर या मशीनमधून निघणारे रेडिएशन्स कॅन्सरचं कारण ठरु शकतात.

संबंधित बातम्या : 

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढला, मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

‘रेमडेसिव्हीर’ पाठोपाठ वर्ध्यात ‘एम्फेटेरेसिन बी’ इंजेक्शनचीही निर्मिती, म्युकरमायकोसिस रुग्णांना दिलासा मिळणार

Difference between MRI and CT-Scan Machine