नवी दिल्ली – सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आधीच आपल्या जीवनातील चिंता आणि समस्या (stress and problems) वाढलेल्या असतानाच, आपण आपला स्ट्रेस वाढवण्यासाठी आणखी एका समस्येला आमंत्रण दिले आहे, त्याचे नाव आहे सोशल मीडिया (social media) .. याला व्हर्च्युअल वर्ल्ड (virtual world) किंवा दिखाव्याचे जगही म्हणता येऊ शकते. याच्या वापरामुळे आपल्या स्वत:बद्दल आणि इतरांबद्दलच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या नसतात , ज्याने फार फरक पडाला नको, त्यामुळेही आपली झोप उडते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर हानिकारक परिणाम होण्यास सुरूवात झाली आहे.
मात्र, याबाबत लोकांमध्ये हळूहळू जागरुकता वाढू लागली आहे. काही काम नसेल तर अनेक लोकं सोशल मीडियावर वेळ घालवताना दिसतात. पण सोशल मीडिया येण्यापूर्वीही लोकं आपलं जीवन जगायचे. आपल्या तुलनेत त्यांच मानसिक स्वास्थ्य उत्तम असायचं. सोशल मीडियाच्या वापराऐवजी आपण आणखी काय-काय करू शकतो, हे जाणून घेऊया..
सोशल मीडिया वापरण्याऐवजी करा या गोष्टी –
– फिरायला अथवा चालायला जाऊ शकता.
– गाणी, संगीत ऐकावे
– सेंटेड कॅन्डल्स लावून छान पुस्तक वाचू शकता.
– आर्ट किंवा क्राफ्ट करू शकता.
– चविष्ट जेवण बनवू शकता.
– पेटिंग आवडत असेल तर त्यामध्ये वेळ घालवू शकता.
– योगासने अथवा मेडिटेशन करावे
– जुने फोटो पाहून , जुन्या आठवणी ताज्या करू शकता.
एकटं रहायची इच्छा नसेल तर या गोष्टी ट्राय कराव्यात –
– एखादा मित्र किंवा कुटुंबियांना फोन करून त्यांच्याशी पोटभर गप्पा मारा.
– एखाद्या मित्राला घरी यायचे आमंत्रण द्यावे.
– आपले शेजारी किंवा आसपासच्या व्यक्तींशी संपर्क साधा, गप्पा मारा.
– विकेंडला मित्रांसोबत जेवायला, ट्रेकला किंवा शॉपिंगला जायचा प्लान करा.
– नवी गोष्ट शिकण्यासाठी क्लास जॉईन करा.
– पेटिंग, नृत्य किंवा नवा क्लास सुरू करा.
– घरी बागकामात वेळ घालवा.
– पॉडकास्ट ऐका.
सोशल मीडियावर वेळेची मर्यादा सेट करा –
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्रेक घेणे चांगले आहे, परंतु जर तुम्ही पूर्णपणे ब्रेक घेऊ शकत नसाल, तर त्याच्या वापरासाठी एका वेळेची मर्यादा निश्चित करा. जर सोशल मीडिया तुमच्या आयुष्याचा एक भाग असेल तर ते ठीक आहे. अशा प्रकारे आपण तुम्ही सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी मार्ग शोधू शकता.
– तुमच्या मूडवर किंवा प्रतिमेवर नकारात्मक परिणाम करणारी खाती अनफॉलो करा.
– कोणतेही नकारात्मक DM, ट्रोलिंग किंवा स्पॅम हटवा.
– तुमची इतरांशी तुलना करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट सेव्ह करू नका.
– फिल्टरचा वापर करणे बंद करा आणि स्वत:ची प्रतिमा स्वीकारा.
– इतरांच्या पोस्टवर उत्साह वाढवणाऱ्या पोस्ट किंवा कॉमेंट्स करा.
– तुम्ही सोशल मीडियामधून ब्रेक घेण्याचा विचार करत असल्यास, इतरांना ते असेच करू शकतात याची आठवण करून देण्यासाठी पोस्ट करा.