मुंबई : आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाच्या राहणीमानात देखील बदल झाले आहेत. कामामुळे दररोजची धावपळ, टेन्शन, मोबाईलचा अतिरिक्त वापर, लेट नाईट पार्टी अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. आजकालचे लोक कामाच्या धावपळीमुळे किंवा एखाद्या गोष्टीच्या स्ट्रेसमुळे पुरेशी झोप घेत नाहीत.
काहीच लोक असे असतात की जे पुरेशी झोप घेतात, पण बहुतेक लोक पुरेशी झोप घेत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ञांनी देखील सांगितलं आहे की, प्रत्येकाने आठ ते बारा तास पुरेशी झोप घेतली पाहिजे. पण बरेच लोक असे आहेत की जे पाच तास किंवा त्यापेक्षा कमी तासात झोपतात. तर आज आपण पाच तास किंवा त्यापेक्षा कमी तास झोपल्यामुळे आपल्या शरीरावर किती भयानक पद्धतीने परिणाम होतो याबाबत जाणून घेणार आहोत.
जर आपण पाच तास किंवा त्यापेक्षा कमी तास झोपलो तर त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या डोक्यावरती होतो. झोपताना आपला मेंदू अशाप्रमाणे काम करत असतो की आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात लक्षात राहण्यास मदत होते. पण आपण जर पाच तासांपेक्षा कमी झोपलो तर आपली स्मृती कमी होते.
जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर आपला मेंदू थकून जातो, त्यामुळे आपला मूड देखील नीट राहत नाही. मग आपल्याला डिप्रेशन, एंग्जाइटी, स्ट्रेस आणि मूड स्विंग होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आठ तास पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
तुम्ही पाच तासांपेक्षा कमी झोप घेतली तर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतोच. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे इम्युनिटी. पुरेशी झोप न घेतल्यामुळे आपली इम्युनिटी कमजोर होते. त्यामुळे प्रत्येकाने पुरेशी झोप घेतली पाहिजे.
आजकालच्या भरपूर लोकांना मधुमेहाचा त्रास मोठ्या प्रमाणात होताना दिसतो पण तुम्हालाही वाटत असेल की मधुमेहाचा त्रास आपल्याला होऊ नये तर तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे. कारण पाच तासापेक्षा कमी झोप घेतली तर तुमचे ब्लड शुगर लेव्हल वाढते त्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.