पुणे – कोरोनाचा (Corona) संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra) कमी होत आहे. पुण्यात (Pune) महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शेवटच्या रूग्णाचा काल डिस्चार्ज केला आहे. सध्या एकही कोरोनाचा रूग्ण पुण्यात उपचाराधीन नाही. तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते रूग्ण त्यांच्या घरी होम क्वॉरंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असून सर्वजण होम क्वॉरंटाईन आहेत. पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारकडून लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या लोकांच्यात एक उत्साह पाहायला मिळत आहे. दोनवर्षे लोकांनी कोरोनाच्या निर्बंधात काढल्याने लोकं तणावात होती.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमधली सरकारी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांनी भरली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांनी भीतीपोटी जीव सोडला. कोरोनाच्या काळात अनेक रूग्णांचा मृत्यू झाला. परंतु सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग पुर्णपणे कमी झाला असून विपुल प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत. पुण्यात कोरोना सुरू झाल्यानंतर अत्यंत भयावह परिस्थिती होती. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते. परंतु सध्या कोरोनाचा एकही रूग्ण रूग्णालयात नाही. पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी अशी माहिती दिली आहे.
सध्याची पुण्यातील कोरोना स्थिती
– दिवसभरात रुग्णांना 01 डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 00, एकूण मृत्यूः ००
– एकूण मृत्यू – 9349
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 652498
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 1251
पुण्यात सध्या कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असून त्यांची आरोग्यस्थिती बरी आहे. त्यामुळे त्यांच्यावरती घरीच उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाचे त्यांच्या संपर्कात असून त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. रूग्णसंख्या कमी झाल्याने लोकांची चिंता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुण्यातील सगळ्या बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. लोक सुध्दा खरेदीसाठी आता घराच्या बाहेर पडू लागले आहेत.