नवी दिल्ली – अनेक लोकं शरीरात युरिक ॲसिडची (uric acid) पातळी वाढत असल्याची तक्रार करतात. युरिक ॲसिड हा शरीरातील नैसर्गिक टाकाऊ पदार्थ आहे, जो शरीरातून बाहेर पडत राहतो. मात्र प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने हे ॲसिड वाढते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले तर ते शरीराच्या सांध्यांमध्ये जमा होते आणि मग सांधेदुखीचे (joint pain)सत्र सुरू होते. अशा परिस्थिती हाता-पायांना सूज (swelling) येणे, चालण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढेल अशा काही भाज्यांचे (avoid these vegetables) सेवन करणे तुम्ही टाळले पाहिजे. त्या भाज्या कोणत्या हे जाणून घेऊया.
युरिक ॲसिडची पातळी वाढलेल्यांनी या भाज्यांपासून रहावे दूर
पालक – हिवाळ्याच्या दिवसात पालकाची भाजी चांगली मिळते, बरेचसे लोक त्याचे खूप सेवनही करतात. पालक हा लोहाचा चांगला स्त्रोत मानला जातो. एवढंच नव्हे तर पालकामध्ये प्रोटीन आणि प्यूरीन हे दोन्ही आढळतं. मात्र युरिक ॲसिडची पातळी वाढलेल्या व्यक्तींनी हे दोन्ही घटक टाळावेत. कारण पालकामध्ये असलेल्या या घटकामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढलेल्या रुग्णाला सांधेदुखी आणि हातापायांना सूज येणे, असे दोन्ही त्रास होऊ शकतात.
अळूची पानं – अळू ही एक तंतुमय भाजी आहे, जी बहुतेक लोकांना खायला आवडते. अळूच्या पानांचे वेगवेगळ्या भाज्यांबरोबर कॉम्बिनेशन करून स्वादिष्ट भाजी बनवली जाते. पण ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी चुकूनही अळूची पानं किंवा अळूची भाजी खाऊ नये. यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते.
बीन्स – बीन्समध्ये युरिक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे ज्यांची युरिक ॲसिडची पातळी वाढली असेल अशा रुग्णांनी बीन्स खाणे टाळावे. अशा रुग्णांनी बीन्स खाल्ल्यास त्यांना (हातापायाला) सूज येण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
फ्लॉवर – अनेक लोकं फ्लॉवरची भाजी मोठ्या आवडीने आणि उत्साहाने खातात. एवढंच नव्हे तर त्याचे पराठे आणि भजीही खूप चविष्ट लागते. हिवाळ्याच्या दिवसात ताजा फ्लॉवर मिळतोही खूप. पण ज्यांची युरिक ॲसिडची पातळी वाढली असेल त्यांनी ही भाजी अजिबात खाऊ नये. फ्लॉवर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्युरीन खूप जास्त प्रमाणात आढळते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)