Tonsil Stones : घशात होतोय सतत त्रास ? नका करू दुर्लक्ष, जाणून घ्या टॉन्सिल स्टोनची लक्षणे

| Updated on: Feb 09, 2023 | 12:26 PM

नियमितपणे ब्रश करून आणि फ्लॉसिंग करूनही श्वासाला दुर्गंध येत असेल व त्यासह घशाच्या मागील बाजूस अस्वस्थ करणारी वेदना असेल तर हे वेगवेगळ्या आजारांचे संकेत असू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे टॉन्सिल स्टोन ...

Tonsil Stones : घशात होतोय सतत त्रास ? नका करू दुर्लक्ष, जाणून घ्या टॉन्सिल स्टोनची लक्षणे
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : टॉन्सिल स्टोनही (Tonsil Stone) घशाची गंभीर समस्या आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. नियमितपणे ब्रश करून आणि फ्लॉसिंग करूनही श्वासाला दुर्गंध येत असेल व त्यासह घशाच्या मागील बाजूस अस्वस्थ करणारी वेदना असेल तर हे वेगवेगळ्या आजारांचे (disease) संकेत असू शकतात. यामध्ये स्ट्रेप थ्रोट किंवा टॉन्सिलिटिस यांचा समावेश असू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या टॉन्सिलवर पिवळे-पांढरे दाणे दिसले तर तुम्हाला टॉन्सिल स्टोन होण्याची (symptoms) शक्यता आहे.

टॉन्सिल स्टोन हे बहुतांश वेळेस अगदी छोट्या दगडाच्या आकाराचे असतात, पण काही वेळेस ते इतके लहान असतात, की ते उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. परंतु वेळेत उपचार न केल्यास आणि दीर्घकाळ वाढत राहिल्यास, ते गोल्फ बॉलच्या आकाराचे किंवा त्याहूनही मोठे होऊ शकतात. टॉन्सिल स्टोन हे सहसा मऊ असतात, पण काही वेळेस ते कडक आणि फिकट पिवळे किंवा पांढरे देखील असू शकतात. टॉन्सिल स्टोनची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.

टॉन्सिल स्टोनची लक्षणे –

हे सुद्धा वाचा

– वेदना

– कानात वेदना

– गिळण्यास त्रास होणे

– श्वासाला दुर्गंध येणे

– गळ्यात खवखव होणे

– सौम्य पिवळ्या रंगाचे अथवा पांढऱ्या रंगाचे टॉन्सिल

– घशाच्या मागच्या (बाहेरील) बाजूस वेदना जाणवणे

– घशाचा संसर्ग

टॉन्सिल स्टोनचा त्रास आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी बरेचदा लोक आरशात बघण्याचा प्रयत्न करतात. परंतु टॉन्सिल स्टोन हे नेहमी उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. काहीवेळा ते उघड्या डोळ्यांना दिसण्यासाठी ते खूप लहान असतात. जेव्हा टॉन्सिल स्टोन आणि टॉन्सिलिटिस दोन्ही घशात असतात, तेव्हा तुमच्या घशात वेदना कशामुळे होत आहे हे ठरवणे कठीण होऊ शकते. टॉन्सिल स्टोनची कारणे आणि धोके जाणून घेऊया-

टॉन्सिल स्टोनची कारणे आणि धोके

टॉन्सिल्सचा पृष्ठभाग काही लोकांमध्ये गुळगुळीत असतो आणि इतरांमध्ये अधिक असमान असते, ज्यामध्ये “क्रिप्ट्स” नावाचे खडे आणि खिसे असतात जे अन्न कण, जीवाणू, लाळ आणि इतर कचरा पकडण्याठी खोल असतात. अन्न, पट्टिका आणि त्वचेच्या अनेक पेशी, तोंडाचे अस्तर यासारखे सेल्युलर टाकाऊ पदार्थ हे सर्व या खड्ड्यांमध्ये जमा होतात, ज्यामुळे टॉन्सिलचे दगड तयार होतात.

तुमच्या टॉन्सिलचा आकार हाही टॉन्सिलच्या स्टोन तयार होण्यामागे एक घटक असतो. अधिक “क्रिप्ट्स” असलेल्या लोकांमध्ये टॉन्सिल स्टोन विकसित होण्याची अधिक शक्यता असते. तसेच खराब तोंडी स्वच्छतेमुळे टॉन्सिल स्टोन विकसित होऊ शकतात आणि घशाच्या मागील बाजूस नियमितपणे घासणे, फ्लॉस करणे आणि गुळण्या केल्याने ही समस्या रोखण्यास मदत मिळू शकते.

असा करा प्रतिबंध

टॉन्सिल स्टोनवर सामान्यतः घरी उपचार केले जाऊ शकतात. काही लोक या वस्तू बाहेर ढकलण्यासाठी कापसाचा किंवा बोटांचा पार करतात. जर तुम्हाला याच त्रास होत असेल हे स्टोन बाहेर काढण्यासाठी वॉटर फ्लॉसर वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. नियमितपणे ब्रश करणे आणि फ्लॉस करणे यासारख्या चांगल्या सवयींचा अवलंब करून टॉन्सिल स्टोन टाळता येऊ शकतात. यामुळे बॅक्टेरियाही दूर ठेवण्यास मदत मिळते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)