Heart Attack | धाप लागणे, खांदे दुखीकडे दुर्लक्ष करताय? ‘ही’ असू शकतात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे!

| Updated on: Feb 17, 2021 | 1:38 PM

रक्तामध्ये गाठीमुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात, म्हणजेच शरीराच्या इतर भागात रक्त संक्रमित करण्यासाठी जास्त दबाव निर्माण होतो.

Heart Attack | धाप लागणे, खांदे दुखीकडे दुर्लक्ष करताय? ‘ही’ असू शकतात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे!
हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणे
Follow us on

मुंबई : खराब जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढला आहे. या प्रकारच्या समस्यांमुळे कोणत्याही वेळी हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. वास्तविक, रक्तामध्ये गाठीमुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात, म्हणजेच शरीराच्या इतर भागात रक्त संक्रमित करण्यासाठी जास्त दबाव निर्माण होतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंचा प्रसार होऊ लागतो आणि हृदयाचे आकार बदलू लागतो. हृदयविकाराच्या झटक्याचे हे एकमेव कारण आहे. चला तर, जाणून घेऊया अधिक लक्षणांबद्दल…(Do not ignore the symptoms of heart attack)

हृदयाचा ठोका कमी/जास्त

एखाद्या व्यक्तीला अत्यंत चिंताग्रस्त किंवा उत्साहित झाल्यास हृदयाचा ठोका कमी किंवा जास्त होणे सामान्य आहे. परंतु, जर आपल्या हृदयाचा ठोका काही सेकंदांपेक्षा अधिक काळ अनियंत्रित होत असेल, तर तो एक मोठी समस्या निर्माण करू शकतो. या प्रकरणात, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

हाताला किंवा टाचेला सूज येणे

जर एखाद्या व्यक्तीच्या हात-पायाचे पंजे किंवा टाचात सूज येण्याची समस्या वाढत असेल, तर तो गंभीर विषय असू शकतो. डॉक्टर म्हणतात की, बर्‍याचदा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय रक्त योग्यरित्या रक्त पंप करण्यास सक्षम नसते, तेव्हा हात पायात सूज येणे वाढू लागते.

घाम येणे

शरीरातून जास्त प्रमाणात घाम येणे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. विशेषत: जर आपल्याला अगदी कमी तापमानात म्हणजेच थंडीतही घाम येत असेल, तर ही समस्या अधिक गंभीर बनू शकते.

खांदा दुखणे

आपल्या खांद्यावर किंवा आपल्या हाताव्यतिरिक्त कंबरेमध्ये सतत वेदना होत असल्यास काळजी घ्यावी. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी ही लक्षणे बर्‍याच रुग्णांमध्ये दिसतात.

जबडा, दात किंवा डोकेदुखी

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी बर्‍याच रूग्णांना हात, जबडा, दात किंवा डोके दुखण्याची समस्या उद्भवते. आपणासही या प्रकारची प्रकारची समस्या येत असल्यास, लवकरात लवकर याची तपासणी करा (Do not ignore the symptoms of heart attack).

सतत खोकला

सतत खोकला हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजारांशी जोडणे योग्य नाही. परंतु, जर आपण एखाद्या हृदयरोगाशी झुंज देत असाल, तर सततच्या खोकल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तज्ज्ञ म्हणतात की, जर खोकताना पांढरे किंवा गुलाबी रंगाचा श्लेष्मा बाहेर येत असेल, तर ते हार्ट फेल्युअरचे लक्षण असू शकते.

श्वास घेण्यात अडचण

जर आपल्याला श्वास घेण्यात त्रास होत असेल किंवा पूर्ण श्वास घेतल्यानंतरही आपल्याला श्वासोच्छवास होत असेल, तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. या व्यतिरिक्त काही लोकांना चिंताग्रस्तपणा, पचन, छातीत जळजळ, धाप लागणे आणि पोटदुखीचा त्रास देखील असू शकतो.

छातीत जळजळ किंवा अपचन

तुमच्या छातीत जर सतत जळजळ होत असेल किंवा तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. अकारण अपचन हृदयविकाराचा झटका असल्याचे देखील लक्षण आहे.

उलट्या

वारंवार उलट्या होणे आणि ओटीपोटात दुखणे देखील हृदयविकाराच्या झटक्याआधी दिसणार्‍या लक्षणांपैकी एक आहे. या प्रकारच्या लक्षणे गंभीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घोरणे

झोपेमध्ये घोरणे सोपे आहे. तथापि, जोरात घोरण्याच्या आवाजाने गुदमरल्यासारखे वाटणे हे हृदय विकाराचे लक्षण असू शकते. रात्री झोपताना बरेचदा आपला श्वास थांबतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Do not ignore the symptoms of heart attack)

हेही वाचा :