पाठदुखी, त्वचेला खाज येणे अन् बरंच काही… किडनीच्या आजारापूर्वी शरीराकडून मिळतात अनेक संकेत

| Updated on: Mar 29, 2023 | 9:01 AM

आपल्या शरीरातील टाकाऊ अथवा विषारी पदार्थ बाहेर टाकणे हे किडनीचे मुख्य काम आहे. त्यामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात. किडनीच्या आजारापासून वाचण्यासाठी त्याची सुरूवातीची लक्षणे ओळखणे खूपच महत्वाचे आहे.

पाठदुखी, त्वचेला खाज येणे अन् बरंच काही... किडनीच्या आजारापूर्वी शरीराकडून मिळतात अनेक संकेत
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाच्या अवयवांमध्ये किडनीचा (kidney) समावेश होतो. बीन्सच्या आकारासारखी दिसणारी किडनी ही रक्त शुद्ध करण्यासोबतच शरीरातील टॉक्सिन्स (toxins) अथवा विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. जर तुमची किडनी कोणत्याही कारणाने खराब झाली तर त्यामुळे तुमचे शरीर अनेक आजारांनी (many diseases) घेरले जाते. किडनी शरीरातील पीएच पातळी, मीठ आणि पोटॅशिअमचे प्रमाण देखील नियंत्रित करते. चुकीचे खाणेपिणे आणि अनियमित जीवनशैलीमुळे किडनीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अति मद्यपान, हृदयविकार, हेपिटायटीस सी आणि एचआयव्ही ही देखील किडनी निकामी होण्याची प्रमुख कारणे आहेत.

किडनीच्या आजाराला सायलेंट किलर का म्हटले जाते ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, किडनीच्या आजारांना सायलेंट किलर म्हणतात कारण 90% रुग्णांमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हे टाळण्यासाठी किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

किडनीच्या आजारातील या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

डॉक्टरांनी सांगितले की किडनीचा आजार प्राथमिक अवस्थेत सायलेंट असतो. सीरम क्रिएटिनिन आणि लघवीतील अल्ब्युमिन तपासण्यासारख्या चाचण्यांच्या मदतीने त्याचे निदान करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतरच्या टप्प्यात, किडनीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णांना संपूर्ण शरीरात सूज येणे, लघवीमध्ये फेस येणे आणि कधीकधी रक्त येणे, असा त्रास सहन करावा लागू शकतो. किडनीचे कार्य कमकुवत झाल्याने शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी द्रव्ये जमा होऊ लागतात. त्यामुळे पाठदुखी, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, बरगडी दुखणे असे त्रास होतात. त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे ही देखील किडनी विकाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. उच्च रक्तदाब हे किडनीच्या समस्येचे सर्वात सामान्य आणि लवकर चेतावणी देणारे लक्षण आहे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

या लोकांनी करावी नियमित तपासणी

“उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या रुग्णांनी कोणतीही लक्षणे नसली तरीही त्यांच्या किडनीची नियमितपणे तपासणी करून घ्यावी,” असे डॉक्टरांनी सांगितले. किडनीकडून लवकरात लवकर संकेत मिळावेत यासाठी किडनीची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: ज्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास आहे, त्यांनी वेळोवेळी त्यांच्या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

किडनीच्या आजारांच्या निदानाविषयी डॉक्टर सांगतात, ” किडनी फंक्शन टेस्ट, लघवीचे मूल्यमापन (urine evaluation) आणि ब्लड प्रेशरशी संबंधित चाचण्यांमुळे किडनीच्या समस्या लवकरात लवकर ओळखता येतात, त्यानंतर योग्य उपचार केल्याने किडनीचे कार्य पूर्ण बरे होऊ शकते. आणि हा आजार वाढण्यापासून रोखता येईल.”