Banana Health Benefits: सुपरफूड असलेलं केळं खाण्याचे किती तरी फायदे, तुम्हाला कोणते माहीत आहेत ?

| Updated on: Aug 30, 2023 | 6:09 PM

Banana Health Benefits : केळ्यामध्ये अशी अनेक तत्वं असतात, जी आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.त्यामध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम झिंक व इतर अनेक पोषक तत्वं असतात. त्यामुळे पाचन चांगले राहते तसेच वजन कमी करण्यासही मदत होते.

Banana Health Benefits: सुपरफूड असलेलं केळं खाण्याचे किती तरी फायदे, तुम्हाला कोणते माहीत आहेत ?
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली |30 ऑगस्ट 2023 : केळं (banana) खायला आवडत नाही, अशी एखादी व्यक्ती विरळाच ! त्याची चव तर मधुर, उत्तम असतेच पण त्यात अनेक फायदेशीर गुणधर्मही असतात. एनर्जीने युक्त असलेले हे फळ खाल्ल्याने आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो. त्यामध्ये डाएटरी फायबर, मँगनीज असे अनेक पोषक घटक असतात. केळं हे सुपरफूडही (superfood) मानलं जातं. त्याचे कोणकोणते फायदे आहेत, ते जाणून घेऊया.

इम्युनिटी वाढते

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात, जे शरीराच्या विकासासाठी उपयुक्त असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे आपले संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात केळी महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे आहारात केळीचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम व मॅग्नेशिअम असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते

किडनीसाठी गुणकारी

पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असलेले केळं खाणं हे किडनीसाठी देखील गुणकारी असते.

वजन कमी करण्यात होते मदत

केळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ओव्हरइटिंग पासून बचाव होतो. तसेच केळ्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळीही संतुलित राहते.

लाल रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये सहाय्यक

ज्या लोकांना ॲनिमियाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी केळ्याचे सेवन अतिशय लाभदायक ठरते. तसेच त्यामध्ये लोह देखील भरपूर असते. जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. केळं खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)