Floor Sitting Benefits : जमिनीवर बसणे (sitting floor) ही प्राचीन भारतीय संस्कृती आहे. आपल्याकडे जेवणापासून ते अभ्यास करण्यापर्यंत अनेक गोष्टी जमिनीवर बसून केल्या जातात. मात्र काळ बदलल्याने आता खुर्ची आणि सोफ्याने आपले स्थान निर्माण केले आहे. या गोष्टींमुळे आपली जीवनशैली बदलली आहे. सुविधा वाढल्यामुळे आराम तर मिळतो पण त्यामुळेच आरोग्याच्या समस्याही वाढताना दिसत आहे. जमिनीवर बसणे ही केवळ आपली संस्कृतीच नव्हे तर त्याचे आरोग्याला (benefits for health) अनेक फायदेही मिळतात. जर तुम्हाला जमिनीवर बसण्याचे फायदे माहित कळले (Sitting on Floor Benefits), तर तुम्ही खुर्चीवर बसणे बंद कराल.
जमीनीवर बसण्याचे जबरदस्त फायदे
1) मन सकारात्मक राहतं
जमिनीवर बसल्याने मनातील सकारात्मकता वाढते. यामुळे हृदय आणि मनातील नकारात्मकता दूर होते. जर तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटे जमिनीवर बसलात तर तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवेल.
2) शरीर लवचिक होते
जमिनीवर बसणे आणि उठणे यासाठी शरीराचे सर्व मुख्य सांधे वापरले जातात. तसेच अनेक स्नायूंचेही कार्य होते. रोज जमिनीवर बसणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्याचा नियमित सराव केल्याने आपले शरीर अधिक लवचिक बनते.
3) मेंदूसाठी फायदेशीर
पद्मासन आणि सुखासनाप्रमाणे जमिनीवर मांडी घालून बसणे हे मनासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुमचे मन अभ्यासात गुंतत नसेल किंवा तुमचे मन चंचल असेल तर जमिनीवर बसण्याची सवय लावा. त्याने मन एकाग्र करण्यास मदत होते.
4) शरीराचे पोश्चर सुधारते
जर तुम्ही रोज जमिनीवर बसत असाल तर तुमच्या शरीराची स्थिती सुधारते. दररोज जमिनीवर बसल्याने स्नायू आणि सांध्याचे कार्य चांगले राहते व बॉडी पोश्चर सुधारते.
5) पाचन तंत्र सुधारते
जमिनीवर बसल्याने पचनक्रिया चांगली होते. जमिनीवर बसून खाणे पोटासाठी फायदेशीर असते. यामुळे पचनसंस्थेच्या समस्या कमी होतात. म्हणूनच रोज जमिनीवर बसले पाहिजे. शक्य असल्यास जमिनीवर बसून जेवावे. त्यामुळे अन्न चांगले पचते.