प्लास्टिक किंवा पेपर कप मध्ये चहा पिण्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ?

| Updated on: Jul 11, 2023 | 2:37 PM

अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये कोणतेही गरम पेय पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

प्लास्टिक किंवा पेपर कप मध्ये चहा पिण्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ?
Follow us on

Side Effects of Plastic And Paper Cups : जर तुम्हालाही बाहेर खाण्या-पिण्याची आवड असेल तर तुम्ही पेपर (paper cup) किंवा प्लास्टिकच्या कपमधूही (plastic cup) पदार्थांचे सेवन केले असेलच. एखादा कॅफे असो किंवा कोणताही स्टॉल बऱ्याच ठिकाणी पेपर किंवा प्लास्टिक कप्सचा वापर केला जातोच. त्यामध्ये द्रव पदार्थ पिणे सोपं असतं, त्यामुळे त्याचा दररोज मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

पण सहज वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? ते दीर्घकाळ वापरणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे का? प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये चहा प्यायल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो, ते जाणून घेऊया.

प्लास्टिक कपमध्ये चहा पिणं नुकसानकारक असतं का ?

प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात. काही प्लास्टिकचे कप बिस्फेनॉल A (BPA) किंवा phthalates सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात, जे पेयांमध्ये वितळतात आणि थेट शरीरात जाऊ शकतात. Bisphenol A (BPA) किंवा phthalates याचा शरीरात प्रवेश झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीराच्या अनेक भागांवर विपरीत परिणाम दिसून येतात.

पेपर कपमध्ये चहा पिणं नुकसानकारक असतं का ?

प्लास्टिकमुळे होणारी हानी टाळण्यासाठी बहुतेक लोक पेपर कप वापरतात. पण पेपर कप वापरणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पेपर कप तयार करण्यासाठी, प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते. या पेपर कपमध्ये गरम पेय किंवा पदार्थ टाकल्यास त्यामध्ये रसायने मिसळू शकतात. त्यामुळे याच्या सेवनाने हे विषारी पदार्थ थेट शरीरात जाऊ शकतात.

सुरक्षित पर्याय कसा निवडावा ?

प्लास्टिकपासून होणारा धोका कमी करण्यासाठी, बीपीए-मुक्त आणि पॉलीप्रॉपिलीन किंवा पॉलिथिलीन सारख्या सामग्रीपासून बनवलेले कप वापरणे अधिक सुरक्षित असू शकते. यासोबतच, गरम वस्तूंच्या सेवनासाठी फूड ग्रेड अंतर्गत बनवलेले पेपर कप वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.