चांगल्या सवयींचे वाईट परिणाम? या Good Habits मुळेही लवकर वाढू शकतं तुमचं वय

| Updated on: Jan 30, 2023 | 9:35 AM

दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयींप्रमाणे चांगल्या सवयी याही लवकर वय वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. डार्क स्पॉट्स, सुरकुत्या येणे, कोरडी त्वचा ही काही अर्ली एजिंग अर्थात लवकर वय वाढण्याची लक्षणे असू शकतात.

चांगल्या सवयींचे वाईट परिणाम? या Good Habits मुळेही लवकर वाढू शकतं तुमचं वय
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – चांगल्या सवयींमुळे आपलं व्यक्तिमत्व (personality) सुधारतं, हे आपण लहानपणी कितीतरी वेळा ऐकले असेल. सवयी या आपल्या जीवनाचा एक भाग बनतात, आपण इच्छा नसतानाही आपण काही सवयींची पुनरावृत्ती करत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला उशीरा झोपण्याची सवय असते, त्या व्यक्तीचे शरीर हळूहळू त्याप्रमाणे तयार होते. आपल्या सवयींचा थेट (habits) परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. जसजसं आपलं वय वाढतं, आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. (वय वाढणं) हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदलणं शक्य नाही. पण काही वेळा आपल्या सवयींमुळेही हे होऊ शकतं. वाईट सवयी आपल्यासाठी घातक असतात पण काही चांगल्या सवयींचा (good habits) अतिरेक तुम्हाला अकाली वृद्ध बनवू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

वाईट सवयींप्रमाणेच आपल्या जीवनशैलीतील काही चांगल्या अथवा आरोग्यदायी सवयी देखील लवकर वृद्धत्व येण्यास कारणीभूत ठरू शकतात. अर्ली एजिंग म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया.

या चांगल्या सवयींमुळे लवकर वाढू शकते तुमचे वय

हे सुद्धा वाचा

वारंवार चेहरा धुणे : आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, ती स्वच्छ ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी अनेक लोक चेहरा स्वच्छ धुवत राहतात. पण वारंवार चेहरा धुण्याच्या सवयीमुळेही लवकर वय वाढू शकते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ लागते, परिणामी त्वचा कोरडी होऊन सुरकुत्यांची समस्या उद्भवू शकते. सुरकुत्यांमुळे चेहरा लवकर वृद्ध दिसू लागतो.

जास्त धावणे : सकाळी उठून धावणे किंवा रात्री धावायला जाणे, हे आपले मन आणि आरोग्य या दोन्हींसाठी फायदेशीर ठरू शकते. पण तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जास्त धावण्यामुळे जळजळ होणे तसेच सूज येणे असा त्रास होऊ शकतो. जास्त धावणे आरोग्यासाठी प्रत्येक वेळेस फायदेशीर ठरेलच असं नाही.

सनब्लॉकचा अतिवापर करणे : टॅनिंगसह त्वचेच्या अनेक समस्या टाळण्यासाठी सनब्लॉक हा उत्तम पर्याय आहे. त्याचा वापर त्वचेचा कॅन्सर आणि फोटोजिंग टाळण्यास देखील मदत करतो. पण सनब्लॉकचा जास्त वापर केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)