नवी दिल्ली : अंडी ही केवळ चविष्टच नसतात तर ती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदेही मिळतात. कारण त्यामध्ये गरजेची अनेक पोषक तत्वं असतात. बऱ्याच जणांचा नाश्त्यात किंवा डाएटमध्ये अंड्याचा (eggs) समावेश असतो. मात्र आजकला बरेच जण शाकाहारी डाएट फॉलो करतात. त्यामुळे ते अंडी किंवा नॉनव्हेज तसेच डेअरी प्रॉडक्ट खाणे टाळतात.
अचानक अंडी खाणे सोडल्यास काय फरक पडतो ?
जे लोक नेहमी अंडी त्यांनी महिनाभर अंडी खाणे बंद केले तर काय होईल ? त्याचा शरीरावर काय परिणाम होईल ? एका रिपोर्टनुसार, आहारातून अंडी काढून टाकल्याने शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. यामुळे शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण अंडी ही प्रथिने, अमीनो ॲसिड, जीवनसत्त्वे आणि लोह यांचा चांगला स्रोत असतात.
यामुळे स्नायूंची देखभाल, आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती यावर मोठा प्रभाव पडू शकतो. एखाद्या व्यक्तीला दररोज अंडी खाण्याची सवय असेल आणि त्याने जर अचानक अंड खाणं सोडलं तर त्याला जेवल्यावरही समाधान मिळणार नाही. काही खाल्लंच नाही असं वाटेल. कारण अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असते, ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. अचानक अंड सोडल्यावर कोलेस्ट्रॉलही वर-खाली होऊ शकतं.
अंडी खाणे सोडलं तर शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळावे यासाठी तुम्हाला बीन्स, मासे खावे लागतील.
अंड्यांमध्ये भरपूर पोषक तत्वं असतात. त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या जवळजवळ प्रत्येक पोषक घटकांचा समावेश असतो. त्यात फॉस्फरस, जीवनसत्त्वे अ, ब, ड आणि ई, आणि लोह हेही असते.
अंडी खाल्ल्याने हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो कारण त्यात ओमेगा 3-फॅटी ॲसिड असते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)