मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : आजकाल प्रत्येक जण आपल्या राहणीमानाप्रमाणे प्रगत जीवनशैलीचे अनुकरण करीत असतो. घराच्या दरवाजापासून ते बेडरुम, गेस्टरुम आणि बाथरुम आपण सजवत असतो. त्यामुळे घरातील फर्निचरपासून ते इतर वस्तूंची आपल्या सोयीप्रमाणे निवड करीत असतो. काही वस्तूंना आपण साफसफाईसाठी आणतो तर काही वस्तू उच्च रहाणीमानासाठी आपल्याशा करीत असतो. परंतू या काही वस्तू आणताना आपल्याला त्यामागील धोका माहीती नसतो.
आपल्या जीवनशैलीनूसार अलिकडे काही बदल आपण केलेले आहेत. त्यासंदर्भात सोशल मिडीयावर डॉ. स्कॉट नुरदा यांनी सावध केले आहे. बाथरुममध्ये अलिकडे सर्रास वापरले जाणाऱ्या एका वस्तूमुळे कॅन्सरला निमंत्रण मिळू शकते. लोक या वस्तूला आपल्या सोयीसाठी वापरत असले तरी आरोग्यासाठी ती धोकादायक आहे. चला बाथरुम मधील कोणती वस्तू आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.
डेली मेलच्या वृत्तानूसार फिजिशियन डॉक्टर स्कॉट नूरदा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात माहीती दिली आहे. बाथरुममध्ये टांगलेले प्लास्टीकचे पडदे आपल्या आरोग्याला धोकादायक आहेत. हे पडद्यातून निघणाऱ्या विषारी केमिकल्समुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होऊ शकते. यामुळे आपल्याला मुल होण्यातही अडचण होऊ शकते. व्यंध्यत्व येऊ शकते. तसेच कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊ शकतो. कारण हे पडदे पॉलविनिल क्लोलाइड म्हणजे पीव्हीसीपासून तयार झालेले असतात, हे सिंथेटिक प्लास्टीक आहे. याचा वापर बांधकाम, फूड पॅकेजिंग, वायरिंग आणि गमबूट बनविण्यासाठी होतो.
या प्लास्टीक पडद्यांमुळे लोकांना डोकेदुखी, चिडचिड होणे, तापट स्वभाव होण्यापासून ते व्यंधत्व आणि कॅन्सरसारख्या आजाराला निमंत्रण मिळू शकते. या प्लास्टीकच्या पडद्याऐवजी कापडाचे पडदे लावणे चांगले आहे असे डॉक्टर नुरदा यांनी म्हटले आहे. पीव्हीसीमध्ये विनिल क्लोराईड सारखी रंग नसलेला गॅस बाहेर येतो. हा गॅस तंबाकूच्या धुरात असतो.त्याने लिव्हर, मेंदू आणि फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. तसेच लिम्फोमा आणि ल्युकेमियाचेही कारण ठरु शकतो. प्लास्टीक ऐवजी कापड किंवा थेट काचेचा दरवाजा लावावा असेही त्यांनी म्हटले आहे.