नवी दिल्ली : केळ्याला सुपरफूड म्हणतात. सकाळी रिकाम्या पोटी केळं (banana) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे असे अनेक आरोग्य तज्ञांचे म्हणणे तुम्ही ऐकले असेल. पण हे केळं रात्री (banana at night) खाल्ल्यास ते फायदेशीर ठरेल की हानिकारक, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का ? केळ्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान (energy) राहते. यासोबत पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यात अनेक प्रकारची खनिजेही आढळतात. केळं हे सुपरफूड (superfood) देखील मानले जाते कारण त्यात फायबर असते जे पचन मजबूत करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. दुसरीकडे, काही लोकांना असं वाटतं की रात्री केळं खाल्ल्याने सर्दी आणि खोकला वाढतो आणि घसा बंद होतो.
रात्री केळं खावं की नाही, खरंच नुकसान होतं का ? जाणून घ्या सत्य
खरंतर केळं हे पोटातील श्लेष्माची पातळी वाढवते, त्यामुळे ते पोटात पचायला खूप वेळ लागतो. म्हणूनच आयुर्वेदानुसार रात्री केळी खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. रात्री केळी खाल्ल्याने मेटाबॉलिज्म मंदावते. रात्री केळं खाल्ल्याने लठ्ठपणाही वाढू शकतो.
रात्री चांगल्या झोपेसाठी केळं ठरतं फायदेशीर
रात्री केळं किंवा इतर कोणतेही जड फळ खाल्ल्यास त्यानुसार ऊर्जा खर्च होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. दुसरीकडे, रात्री केळी खाल्ल्याने चयापचय खूप मंदावतो. आरोग्य तज्ञांच्या मते, जर आपण रात्री केळं खाल्ल्यास आपल्याला चांगली झोप येते. कारण केळ्यामध्ये डायरोसिन असते. डायरोसिन नैसर्गिकरित्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोन वाढवते. मेलाटोनिनमुळेच आपल्याला झोप येते.
केळं हे एक असं वैविध्यपूर्ण फळ आहे, जे वजन कमी करण्यासाठी मर्यादित प्रमाणात खाता येऊ शकते. पोटभर जेवण करण्याऐवजी नाश्ता म्हणून केळं खाता येऊ शकतं. केळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्याच्या सेवनाने अनावश्यक कॅलरीज टाळता येतात. मध्यम आकाराचे केळं खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी कसं खावं केळं ?
केळ्यामध्ये हाय सेन्सिटी इंडेक्स आणि फायबर असते. ब्रेकफास्ट करताना किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी केळं खाणं फायदेशीर ठरते. केळं खाल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं.