Coconut Water Benefits | 5 दिवस रोज एका शहाळ्याचं पाणी प्या, पाच रोगांपासून होईल मुक्ती, शरीरावर होतील चांगले परिणाम

| Updated on: Sep 21, 2023 | 4:24 PM

शहाळ्याचं पाणी रोज पिल्याने शरीराला खूपच फायदा होतो. सलग पाच दिवस शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीराचा पाच आजारांपासून बचाव होण्यास मदत होणार आहे.

Coconut Water Benefits | 5 दिवस रोज एका शहाळ्याचं पाणी प्या, पाच रोगांपासून होईल मुक्ती, शरीरावर होतील चांगले परिणाम
COCONUT WATER
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : शहाळ्याचे म्हणजेच नारळाचे पाणी आरोग्यासाठी अगदी वरदान आहे. संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी नारळाचे पाणी खूपच फायदेशीर आहे. नारळपाण्याने हृदयाचं आरोग्य चांगले रहाते. किडनी आरोग्यदायी आहते. वजन कमी करण्यासाठी त्वचेचे रंग उजळण्यासाठी तसेच डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी नारळपाणी महत्वाचे आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स, लॉरिक एसिड, पोटॅशियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. त्या सलग पाच दिवस शहाळ्याचे पाणी प्यायल्याने त्याचे गुणधर्म दिसू लागतात.

एम्सचे माजी कन्सलटंट आणि लाईफ स्टाईल एक्सपर्ट डॉ. बिमल झांजेर यांच्या मते नारळाचे पाणी संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असते. यात कॅलरी एकदम कमी असते. 100 ग्रॅम नारळाच्या पाण्यात केवळ 19 कॅलरी असते. यात काही अमिनो एसिड आणि 4 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. यात 95 टक्के पाणी असते. एक ग्रॅम पेक्षाही कमी फॅट असते. फॅट फ्री नारळ पाणी हृदयासाठी चांगले असते. याने वजन कमी होते. पाच दिवस जर नारळ पाणी पिल्यास शरीरास कोणते फायदे होतात पाहूयात..

डायबिटीजला कंट्रोल

नारळपाण्याने डायबिटीज नियंत्रणात रहातो. डायबिटीज रुग्णांनी नारळपाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट रहाते. आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण केली जाते.

लठ्ठपणावर नियंत्रण

नारळ पाण्याने लठ्ठपणात कमी होण्यास मदत होते. नारळपाण्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकेवर नियंत्रण रहाते. वजन कमी करण्यासाठी नारळपाण्यासारखा पर्याय नाही.

केसांचे आरोग्य राखते

एंटीऑक्सीडेंट, लॉरिक एसिड, बी विटामिन आणि मॅग्निशियम भरपूर असल्याने नारळाचे पाणी केसांचे आरोग्य सुधारते. नारळपाण्याने त्वचा हायड्रेट रहाते आणि केसातील कोंड्यापासून सुटका होते.

किडनी स्टोनपासून बचाव

किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी नारळपाण्याचे सेवन उपयुक्त आहे. नारळ पाणी शरीराला हायड्रेट राखते तसेच किडनीचे आरोग्य सुधारते. एक नारळपाण्यात 600 मिलीग्रॅम पोटॅशियम मिळते. त्याने किडनीचे आरोग्य राखले जाते आणि किडनी स्टोनपासून आराम मिळतो.

डीहायड्रेशन कंट्रोल करते

रोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते आणि शरीर हायड्रेट रहाते. उष्णतेमुळे निर्माण झालेल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सच्या कमतरतेला ते पूर्ण करते.

हृदय रोगापासून बचाव

नारळात फॅट असते परंतू नारळपाणी फॅट फ्री असते. नारळाचे पाणी प्यायल्याने अनेक रोगांपासून बचाव होतो. हार्टच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे. नारळपाण्यात 95 टक्के पाणी असते. कोलेस्ट्रॉल अजिबातच नसते.यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते.