Does Water Affect Hair Growth : प्रत्येक स्त्रिला वाटत असतं की आपण सुंदर दिसावं. त्यासाठी स्त्रिया स्वतःची भरपूर काळजी घेत असतात. मग स्किन केअर असो किंवा केस असो अशा प्रत्येक गोष्टींची स्त्रिया काळजी घेतात. स्किनसोबतच स्त्रियांच्या सौंदर्यात भर टाकणारा महत्त्वाचा भाग म्हणजे केस. केस हे आपल्या चेहर्याला आकर्षक असा लूक देण्यास मदत करतात.
बहुतेक स्त्रियांना लांब केस आवडतात. पण काही महिलांचे केस शॉर्ट असतात किंवा त्यांच्या केसांना वाढ होत नसते. अशा स्त्रीया त्यांचे केस वाढण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण अशा एका उपायाबाबत जाणून घेणार आहोत जो तुमचे केस वाढवण्यास मदत करेल.
तुम्हाला जर लांब आणि दाट केस हवे असतील तर तुम्ही पुरेसं पाणी प्यायला पाहीजे. कारण पाणी प्यायल्याने आपले शरीर निरोगी राहते. पाणी पिल्याने आपली स्किन जशी हेल्दी आणि ग्लोईंग राहते, तसंच केसही दाट आणि लांब होतात. तर आपण पाण्याचा केसांच्या वाढीवर कसा परिणाम होतो याबाबत जाणून घेणार आहोत.
जेव्हा आपल्या केसांच्या मुळांमध्ये पाण्याची पातळी कमी होते तेव्हा केस हे कोरडे आणि पातळ होतात. तसंच यामुळे केसांची वाढ होणं थांबू शकतं. मात्र, जेव्हा तुम्ही पुरेसं पाणी प्याल तेव्हा केसांच्या मुळांना त्याचा खूप फायदा होतो. यामुळे केस दाट होतात आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. पुरेसं पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील आवश्यक पोषक घटक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्याचा परिणाम रक्ताभिसरण प्रणालीवर होतो. त्यानंतर शरीरातील पोषक घटक हे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास सुरुवात होते.
जर केसांची नीट वाढ व्हावी असं वाटत असेल तर दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाण्यात लोह, कॅल्शियम, जिंक हे सर्व घटक असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कॅल्शियमच्या मदतीनं केसांची शाइन वाढण्यास मदत होते. तर लोह हे केस गळती थांबवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जर दररोज पुरेसं पाणी प्यायलात तर तुमची केसांची समस्या दूर होऊ शकते.