मुंबईः मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना (Physical problems) सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महिला आजकाल वेदना कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जो आजकाल खुप उपयुक्त ठरत आहे, ती म्हणजे बाभूळ. बाभूळच्या झाडाबद्दल (About the acacia tree) आपण सर्वांनी ऐकले आहे. झाडाचे लाकूड फर्निचर इत्यादींसाठी वापरले जाते. पण तुम्ही कधी बाभळीच्या झाडाचे साल सेवन केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की बाभळीच्या सालामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कार्बोहायड्रेट्स सारखे घटक आढळतात, त्यामुळे ही साल उकळून त्याचा काढा पिल्याने, अनेक आजारांपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊया बाभळीचा काढा कसा तयार करायचा. आणि मासिक पाळीदरम्यान, हा काढा किती गुणकारी (Curative) आहे.
1. पीरियड्सच्या दुखण्यापासून आराम मिळवणे – बाभळीच्या काढ्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. याने पीरियड्सची समस्या दूर होऊ शकते, मासिक पाळीच्या वेळी पोटात खूप दुखत असेल किंवा पेटके येत असतील, तर, मग या काढ्याचे सेवन करा, तुम्हाला खूप फायदे होतील.
अनेक वेळा मासीकपाळी दरम्यान, पोटाच्या समस्येमुळे तोंडात फोड येतात, अशा परिस्थितीत बाभळीचा रस प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे अल्सरलाही लवकर आराम मिळतो. याशिवाय बाभळीच्या सालाने दात स्वच्छ होतात.
बाभळीचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते. असे सांगण्यात येते मेंदूतील रक्तप्रवाह सुधारणे, केस गळणे थांबवणे आणि वाढ वाढवणे यासाठीही हे फायदेशीर आहे.
बाभळीचा रस प्यायल्याने पाठदुखी, पाय दुखण्यात खूप आराम मिळतो. बाभूळमध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, अशा स्थितीत त्याचा काढा प्यायल्याने दुखण्यात आराम मिळतो.
बाभूळ दातांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे साल दात दातांसाठी खूप चांगले मानले जातात. अशा परिस्थितीत दात निरोगी ठेवण्यासाठी काढा प्या. काढा एक चम्मचही प्यायल्याने दात मजबूत होतात.
असे मानले जाते की बाभळीचा रस नियमित प्यायल्याने शरीराचे वाढते वजनही नियंत्रित राहते. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे वजन वाढण्यास प्रतिबंध करतात.
बाभळीच्या सालाचा काढा तयार करण्यासाठी आपण प्रथम 1 ग्लास पाणी घेऊ, नंतर हे पाणी गॅसवर उकळून घ्या, नंतर त्यात 1 चमचे बाभळीच्या सालाची पूड घाला, आता त्यात पाणी घाला, सुमारे 10 मिनीटे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. यानंतर या पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळा. आता तुमचा काढा तयार आहे.