नवी दिल्ली : कॉफी हे फक्त ऑफिस किंवा फंक्शन्समध्येच नाही तर आज प्रत्येक घरात आवश्यक पेय बनले आहे. केवळ तरुणच नाही तर वृद्ध आणि विशेषत: महिला दररोज कॉफीचे (coffee) घोट घेताना दिसतात. घरात कोणाचाही रक्तदाब कमी झाला किंवा फ्रेश वाटायला (fresh) हवं असेल तर लगेच एक कप कॉफी बनवायची ऑर्डर येते. अनेक लोकं तर सांगतात, की त्यांनी चहा सोडला आहे, आता ते फक्त कॉफी पितात. यामुळेच लोक आता कॉफीचे अनेक कप रिचवतात. पण तुम्ही चहाला पर्याय म्हणून आणि कमी हानीकारक म्हणून जी कॉफी पिता ती तुमच्या शरीराला आतून पोकळ बनवत आहे (side effects of coffee) हे तुम्हाला माहीत आहे का ?
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कॅफिन नैसर्गिकरित्या वनस्पतींच्या बिया आणि फळांमध्ये आढळते. सहसा लोक ते कॉफीच्या रूपात सेवन करतात. तसेच आईस्क्रीम, चॉकलेट्स, एनर्जी बार आणि पेयांच्या रूपात देखील त्याचे सेवन केले जाते. कॅफिनचा जगात सायकोस्टिम्युलंट म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि सायकोस्टिम्युलंट मेंदूला उत्तेजित करून मज्जासंस्थेला आराम देते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील हे सुरक्षित घोषित केले आहे, तरीही त्याचे सतत सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
रोज किती कप कॉफी पिणे योग्य ?
एका दिवसात 400 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी कॅफिनचे सेवन केले पाहिजे जे 4 कप कॉफीच्या बरोबरीचे असते. अनेकदा लोक दिवसभरात अनेक कप कॉफी, चॉकलेट किंवा इतर कॅफिनयुक्त गोष्टी खातात, ज्यामुळे शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत ही सवय तुम्हाला आजारी पडू शकते.
कॉफीच्या अतिसेवनामुळे या आजारांचा असतो धोका
तणाव व डिप्रेशन : कॉफी प्यायल्याने किंवा कॅफेनचे सेवन केल्याने लोकांमध्ये चिंता वाढू शकते. जे लोक आधीच तणाव, नैराश्य यांसारख्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनी कॅफीनचे सेवन केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. याशिवाय, कॅफीनच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर आणि शरीराच्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
ब्लड शुगर : मधुमेहाच्या रुग्णांनी कॉफी घेतल्यास शरीरातील इन्सुलिनच्या गडबडीमुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढू शकते.
इन्सोमेनिया किंवा झोप न येणे : कॉफी प्यायल्यानंतर अनेकांना नीट झोप लागत नसल्याचे आढळून आले आहे. अनेक दिवस सतत कॉफी प्यायल्याने सामान्य परिस्थितीतही झोप येत नाही.
पचनाच्या समस्या : कॅफिनचे सेवन केल्याने पोट खराब होते आणि एखाद्या व्यक्तीला अतिसार होऊ शकतो असे आढळून आले आहे. ज्या लोकांचे पोट ठीक नाही, त्यांना जास्त कॉफी प्यायल्यानंतर जुलाबाची समस्या होऊ शकते.
वारंवार लघवी लागणे : काही लोकांमध्ये कॅफिनच्या सेवनानंतर वारंवार लघवी लागण्याची समस्या वाढते.
महिलांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता : कॅफिनचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो, गर्भपात होण्याची शक्यता वाढते, रजोनिवृत्तीची लक्षणे बिघडतात आणि स्तनांमध्ये सिस्ट्सची शक्यता वाढते.
सांधेदुखी : कॅफिनच्या सेवनामुळे सांधेदुखीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
लवकर वृद्धत्व येणे : कॅफीन कोलेजनचे उत्पादन रोखते, त्यामुळे त्वचा लवकर सैल होऊ लागते. यामुळे लवकर वृद्धत्व देखील होऊ शकते.
इतर लक्षणे : कॅफीनचे अतिसेवन केल्याने डोकेदुखी, चक्कर येणे, निर्जलीकरण, चिडचिड, छातीत जळजळ, मळमळ, स्नायू कमकुवत होणे आणि पोटाच्या गंभीर समस्या अशी इतर अनेक लक्षणे देखील दिसू शकतात.