रात्री झोपण्यापूर्वी रोज खा ‘हा’ पदार्थ, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर

| Updated on: Nov 28, 2024 | 11:28 AM

प्रत्येकाच्या घरात खारीक उपलब्ध असते. आपण सर्वजण अनेकदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खारीक खात असतो पण खारीक खाण्याचे काही खास फायदे जाणून घेऊ.

रात्री झोपण्यापूर्वी रोज खा हा पदार्थ, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर
Follow us on

आयुर्वेदामध्ये खारीक सारख्या अनेक गोष्टींवर संशोधन केल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की आयुर्वेदिक गोष्टींच्या योग्य वापराने मोठ्या आजारांवरही उपचार करता येतात. खारीक खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे नुकतेच समोर आले आहेत. खारीक सामान्यतः गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. जाणून घेऊया खारीक खाण्याचे काय फायदे होतात.

खारीक खाण्याचे फायदे

निसर्गात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यांचा वापर करून आपण आयुष्यभर निरोगी राहू शकतो. सुकामेवा म्हणूनही खारीक वापरतात. मनुक्याप्रमाणेच खारीक देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. खारीक खाण्याचे काही फायदे जाणून घेऊ ज्यामुळे तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवू शकतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की आयुर्वेद आपल्याला केवळ रोग बरे करण्याचे मार्ग सांगत नाही तर रोगांपासून बचाव करण्याचे मार्ग देखील सांगतो. खारकेचा योग्य वापर करून आपण मोठे आजार कसे टाळू शकतो याचाही उल्लेख आयुर्वेदात आहे.

आरोग्य सुधारते

खारीक जीवनसत्वांची खाण मानली जाते. त्यात व्हिटॅमिन ए, सी, के, ई, बी 2, बी 6 नियासिन आणि थायामिनसह अनेक जीवनसत्वे आढळतात. ही जीवनसत्वे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत.

आवश्यक पोषक तत्वांचा स्त्रोत

खारिकमध्ये लोह, पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि तांबे यासारखी सर्व आवश्यक खनिजे देखील असतात. ज्या शिवाय आपल्या शरीराच्या पेशी नियमितपणे कार्य करू शकत नाही.

लोह
खारीक लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शरीरातील सर्वात महत्त्वाच्या खनिजांपैकी एक आहे. लोह हा लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचा प्रमुख घटक आहे आणि रक्तपेशींचे प्रमाण राखण्यासोबतच शरीरातील ऑक्सिजनचा प्रभाव सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी खारीक खूप फायदेशीर आहे.

कॅल्शियम
खारीक मध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. आपली हाडे आणि दात सुरक्षित तसेच मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. याच्या नियमित सेवनाने ऑस्टिओपोरोसिस, संधिवात, ऑस्टियोआर्थराइटिस इत्यादी आणि दातांच्या समस्या दूर होतात.

स्नायू
खारीकचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच स्नायूंची ताकद वाढवणे. खारीक खाल्ल्याने हृदयाच्या स्नायूंवर चांगला परिणाम होतो. गर्भवती महिलांनी नियमितपणे खारीक खाणे फायदेशीर ठरते यामुळे गर्भाशयाचे स्नायू मजबूत होतात.