Monsoon diet tips: रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर खा ‘ही’ 5 फळं, व्हा तंदुरुस्त!

| Updated on: Jul 22, 2022 | 2:47 PM

Ways to boost your immune system: कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर सुखद गारवा घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच आवडतो. मात्र पावसासोबतच (monsoon season) येतात विविध आजार. दूषित पाणी, अन्न यामुळे मुळे अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्याच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे आपण लवकर आजारी पडू शकतो. अशावेळी पौष्टिक आहार आणि भरपूर फळे खावीत. […]

Monsoon diet tips: रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर खा ही 5 फळं, व्हा तंदुरुस्त!
Follow us on

Ways to boost your immune system: कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर सुखद गारवा घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच आवडतो. मात्र पावसासोबतच (monsoon season) येतात विविध आजार. दूषित पाणी, अन्न यामुळे मुळे अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्याच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे आपण लवकर आजारी पडू शकतो. अशावेळी पौष्टिक आहार आणि भरपूर फळे खावीत. तसेच पिण्याचे पाणीही उकळून गार करून घ्यावे. आहारतज्ज्ञांच्या (न्युट्रिशनिस्ट) सल्ल्यानुसार ऋतूमानानसार आहार केल्यास तो आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. तसेच काही फळे (Fruits) अशी आहेत, ज्यांचे नियमितपणे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्तीही (immunity booster) वाढते व आपण आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. फळांमधील पोषक तत्वे आणि पाण्याचे प्रमाण आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया कोणती फळे खाल्याने आपल्याला काय फायदा मिळतो.

जांभूळ

युएसडीएच्या आकडेवारीनुसार, जांभूळात 1.41 मिलीग्रॅम आयर्न (लोह), 15 मिलिग्रॅम कॅल्शिअम आणि 18 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. त्याशिवाय अतिशय चविष्ट असलेले हे मौसमी फळ ॲंटी-ऑक्सीडेंट्सचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, तसेच चमकदार त्वचेसाठीही जांभूळाचे सेवन करणे फायदेशीर आहे. मधुमेह दूर ठेवायचा असेल तर जांभूळ पावडरीचे सेवन करावे.

सफरचंद

An apple a day, keeps the doctor away,ही म्हण तर सर्वांनाच माहीत आहे. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्वेरसेटिन नावाचे फ्लेवोनाईड मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे कोणताही आजार दूर राहतो आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्येही वाढ होते. तसेच पचनशक्तीही सुधारते. शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वे सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.

हे सुद्धा वाचा

डाळिंब

डाळिंब हे फळ बहुगुणी आहे. ते ॲंटी-ऑक्सीडेंट्सचा मोठा स्त्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्की वाढण्यास मदत होते. तसेच वजन कमी करायचे असेल तर डाळिंबाचे सेवन किंवा त्याचा रस पिणे फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे डिटॉक्सही उत्तम होते.

केळं

केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी6 खूप असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्येही वाढ होते. ज्यांना नुसतं केळं खायला आवडत नाही त्या व्यक्ती स्वादिष्ट स्मूदी किंवा बनाना शेक करून केळ्याचा आस्वाद घेऊ शकतात.

नासपती

एक चविष्ट फळ एवढीच नासपतीची ओळख नाही. नासपती खाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि मिनरल्स असतात. त्याच्या सालीत ॲंटी-इन्फ्लेमेटरी फ्लेवोनाईडही असते. पोषक तत्वांचा खजिना असलेले नासपती खाल्यामुळे अनेक आजांरापासून बचाव होतो.