मुंबई : सकाळच्या नाश्त्यात काय खावे आणि काय खाऊ नये हे खूपच महत्वाचे आहे. कारण आपण दिवसाची सुरूवात चांगली केली तर दिवस उत्साहात जात असतो. त्यामुळे सकाळची न्याहरी खूपच महत्वाची असते. सकाळी ब्रेकफास्टमध्ये हेल्दी फूडची निवड करायला हवी. त्यामुळे आपला दिवस एनर्जीने भरलेला जाईल. सकाळचा नाश्ता हा दिवसभरासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे चला सकाळी काय खायला हवे ते जाणून घेऊयात…
1 ) सकाळी कोमट पाणी पिण्याची गरज
सकाळी उठल्यानंतर आपण थोडे गरम केलेले पाणी प्यायला हवे, त्यामुळे पोटातील अवयव साफ होतात. आपल्या दिवसाची छान सुरूवात होते. शरीराला दिवसभर उत्साह मिळतो.
2) बदाम – सकाळी उठल्यानंतर रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खायला हवेत. त्यामुळे सकाळी पोटात ताकद आणि शक्तीवर्धक अन्न जाईल. २० बदाम आणि एक ग्लास दूध पिल्यास दिवसभर ताकद मिळेल.
3 ) मणूके – मणूके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळच्या नाश्त्या आधी खाऊ शकता. योगासने किंवा चालायला जाण्यापूर्वी आपण याचे सेवन करू शकता.
4 ) ओट्स – हल्ली सर्वच जण ओट्स खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्याकरीता ओट्स चांगलाच पर्याय आहे. तो मेटाबॉलिजमला बूस्ट करीत असतो. या ओट्समुळे आपल्याला जर गॅस, अपचन, छातीत जळजळ सारख्या समस्या असतील तर त्या दूर होतील. प्रोटीन आणि फायबर असल्याने ओट्स नेहमीच चांगले मानले जातात.
5) अंडे – आपल्या सकाळच्या न्याहारीसाठी अंडे देखील चांगला पर्याय असू शकते. आपण दिवसाची सुरूवात पाणी पिल्यानंतर नाश्याची सुरूवात उकडलेले अंडे खाऊन करू शकता. किंवा अंड्याचे ऑम्लेट खाणे देखील चांगला नाश्ता होऊ शकतो.
6 ) पोहे – कमी न्याहारी करूनही पोट भरल्याचे फिलींग वाटण्यासाठी पोहे हे उत्तम न्याहरी ठरू शकते. पोहे खाल्ल्यानंतर आपल्या खूप वेळ भूक लागत नाही, शिवाय याने फॅट देखील वाढत नाहीत. याला बनविण्यासाठी थोडी मेहनत लागत असली तरी या फायबर जास्त असते.
7) ग्रीन ज्यूस – बार्ले ग्रास, व्हीट ग्रास आणि मोरिंगा आदी पासून बनवलेला ग्रीन सरबत पिऊन आपण दिवसाची सुरूवात करू शकता. यामुळे आपल्या आतड्यांना शुद्ध करता येते. तसेच पचन यंत्रणेत वाढ होते.
8) दूध आणि चपाती – दूधात चपाती भिजवून खाऊ शकता. गव्हाच्या चपात्या 8 ते 10 तास टीकू शकतात.
9 ) केळ – केळासारखे स्वस्त आणि मस्त फळ नाही. खाली पोट तुम्ही केळी खाऊ शकता. केळांमध्ये उत्तम पोषक तत्वे असतात.
10 ) उकडलेल्या भाज्या – फिट राहण्यासाठी आपल्याला उकडलेल्या भाज्या खाणे ही फायदेशीर ठरू शकते. यात तुम्ही काळे मिट, काली मिरीची पावडर आणि जिरे – हिंगाची फोडणी देऊन खाऊ शकता.