आजकाल व्यस्त जीवनशैली, खराब दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धतींमुळे जगभरातील लाखो लोकांना वजन वाढण्याचा, जाडेपणाच्या (Obesity) समस्येचा सामना करावा लागत आहे. वेळीअवेळी खाणे, अपुरी झोप, पौष्टिक आहार न घेणे, सतत एकाच जागी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, या सर्व गोष्टींचा (Bad lifestyle) परिणाम शरीरावर आणि आरोग्यावर होतो. या सवयींमुळे वजन तर वाढतच (Weight gain) पण तब्येतीच्या तक्रारीही सुरू होतात. सतत वाढणारे वजन हे आरोग्यासाठी धोकादायक असते. भविष्यात त्यामुळे गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र त्याचे प्रमुख कारण असते खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. वजन पटकन वाढेल, अशा पदार्थांचे सेवन तुम्ही करत असाल तर सावध व्हा. निगेटीव्ह कॅलरीवाल्या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि वजन वाढण्याच्या टेन्शनपासून मुक्त व्हा.
हे एक सुपरफूड आहे, ज्याला नो कॅलरी फूडही म्हटले जाते. ओट्समध्ये फायबरसारखे अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे तुम्ही तुमचं मन न मोडता, पाहिजे तितके ओट्स खाऊ शकता. फक्त हे तयार करताना साध्या पद्धतीने बनवावे आणि खावे. ओट्समुळे पोट भरेल आणि वजनही वाढणार नाही.
तुम्ही ब्ल्यूबेरी, स्ट्ऱॉबेरी किंवा ब्लॅकबेरीचे सेवन करू शकता. मुख्य पोषक तत्वे भरपूर असलेल्या बेरीज खाल्यामुळे तुमचे वजन तर वाढत नाहीच, पण तुम्ही हेल्दी आणि तंदुरुस्त राहू शकता. ही फळे खाल्याने तुमचे पोट भरेल आणि फूड क्रेव्हिंगही होणार नाही.
पॉपकॉर्न हे एक अतिशय हेल्दी स्नॅक आहे. मक्यापासून बनणारे पॉकॉर्न्स हे एनर्जीचा उत्तम स्त्रोत आहेत. याचा आणखी एक विशेष गुण म्हणजे हे खाल्याने वजन वाढत नाही तर ते कमी होते. हे खाल्याने चेहऱ्याचा व्यायामही होतो
हा एक असा पदार्थ आहे, जो कॅल्शिअम आणि प्रोटीन यांचा उत्तम स्त्रोत आहे. तुम्ही अननस किंवा पपईसारख्या फळांसोबत याचे सेवन करू शकता. यापासून एक हेल्दी स्नॅक तयार करून खाता येऊ शकते. यामध्ये कार्ब्स आणि फॅट्स दोन्हींचे प्रमाण अगदी कमी असते.
टीप – या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय आणि देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ती अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.