रात्री उशीरा जेवल्याने हार्ट अटॅकचा वाढतो धोका, अभ्यासातून उघड

| Updated on: Dec 17, 2023 | 3:07 PM

रात्री लवकर जेवण केल्याने हृदया संबंधीच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो असे संशोधनातून उघड झाले आहे. या संशोधनासाठी निवडलेल्या समुहात 79 टक्के महिलांचा समावेश होता. त्यांचे सरासरी वय 42 वर्षे होते.

रात्री उशीरा जेवल्याने हार्ट अटॅकचा वाढतो धोका, अभ्यासातून उघड
heart disease
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. नवीन संशोधनात लवकरच जेवण केल्यास हृदयासंबंधीचे आजाराचे प्रमाण कमी होऊ शकते. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानूसार लवकर जेवण फायद्याचे ठरते. संशोधकांनी जेवणाचे सात पॅटर्न आणि हृदय रोग संबंधाचा अभ्यास केला. त्यात त्यांनी न्यूट्रीनेट समुहात 1,03,389 उमेदवारांच्या डेटाचा वापर केला. ज्यात 79 टक्के महिलांचा समावेश होता. त्याचं सरासरी आयुष्य 42 वर्षे होते.

संशोधकांनी विविध समुहातील लोकांच्या आकडेवारीचा आधार घेतला त्यात वय, लिंग, कौटुंबिक स्थिती, आदींचा विचार केला. आहार पोषण गुणवत्ता, जीवनशैली आणि झोपचे चक्र याचे निरीक्षण केले. निष्कर्षानूसार नाश्ता न करणे आणि दिवसाचे पहीले जेवण उशीरा करणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका सर्वाधिक होता. प्रत्येक तासांच्या उशीराने धोक्यात 6 टक्के वाढ झाल्याचे संशोधनात पुढे आले.

हार्ट अटॅकचा धोका

जी व्यक्ती पहिल्यांदा सकाळी 9 वाजता नाश्ता करते, त्यांना हृदय रोग विकसित होण्याची शक्यता सकाळी 8 वाजता नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत 6 टक्के अधिक होती. जेव्हा रात्रीच्या जेवणाची गोष्ट येते त्यावेळी रात्री आठ वाजता जेवण करणाऱ्यांच्या तुलनेत रात्री 9 नंतर जेवणाऱ्यांना सेरेब्रोवास्कुलर रोग जसे स्ट्रोकचा धोका 28 टक्क्यांपर्यंत वाढतो विषेश करून महिलांमध्ये हा धोका वाढल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज अध्ययन

दिवसाचे शेवटचे जेवण आणि दुसऱ्या दिवसाचे पहिले जेवण यातील रात्रीच्या उपवासाचा लांबणारा कालावधी सेरेब्रोवास्कुलर रोगाच्या जोखीमेशी जोडला गेला आहे. दिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या जेवनाचा विचार करता शेवटचे जेवण लवकर खाण्याचा सल्ला दिला जात आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अभ्यासाप्रमाणे हृदय रोग जगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. साल 2019 मध्ये 18.6 दशलक्ष वार्षिक मृत्यू झाले आहेत. ज्यापैकी 7.9 मृत्यू आहारामुळे झाले आहेत.

पहिले आणि शेवटचे जेवण लवकर घ्या

आहार या आजाराचा विकास आणि प्रगतीत मोठी भूमिका निभावत आहे. पाश्चात्य समाजाच्या आधुनिक जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयीत बदल झाला आहे. जसे रात्रीचे उशीरा जेवणे, किंवा सकाळचा नाश्ता न करणे. त्याशिवाय पहिल्या आणि शेवटच्या भोजनातील लांबणाऱ्या उपवासामुळे देखील मोठा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे पहिले आणि शेवटचे भोजन लवकर खाण्याच्या सवयीने हृदय रोगाचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.