Ultra Processed Food Side Effects : अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ खाल्याने मेंदूवर होतो गंभीर परिणाम, ही माहिती जाणून घ्या

| Updated on: Jan 04, 2023 | 1:31 PM

फ्रोजन पिझ्झा किंवा रेडी-टू-ईट पदार्थ अशा अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

Ultra Processed Food Side Effects : अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ खाल्याने मेंदूवर होतो गंभीर परिणाम, ही माहिती जाणून घ्या
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आजकालच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात पिझ्झा, बर्गर, रेडी-टू-ईट (pizza, burger) पदार्थ यासारखे अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ (Ultra Processed Food) हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. या अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांमुळे आपले व्यस्त जीवन अतिशय सोपे बनवले आहे. पण तुमच्या दैनंदिन आहारातील कॅलरीच्या (calories) सेवनापैकी 20% पेक्षा अधिक अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन असेल तर तुम्हाला लवकरच गंभीर आजार होऊ शकतात.

जेएएमए न्यूरोलॉजीमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ खाल्याने संज्ञानात्मक कार्यामध्ये (cognitive function of Brain) गुंतलेल्या मेंदूच्या भागावर परिणाम होतो. खरंतर, सर्वात जास्त अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ खाणारे पुरूष आणि स्त्रिया, यांच्यामध्ये विचार करण्याच्या क्षमतेत 28% जलद घट होते आणि कार्यकारी कार्य करण्याच्या क्षमतेत 25% जलद वेगाने घट होते, असे दिसून आले.

मेंदूसाठी हानिकारक

हे सुद्धा वाचा

सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतर, शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले की अल्ट्राप्रोसेस्ड पदार्थ आपल्या मेंदूसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्याचा थेट परिणाम आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. या अभ्यासानुसार, अल्ट्राप्रोसेस्ड फूडमुळे आपल्या आहाराचा दर्जाही खराब होतो, त्यामुळे त्यातून मिळणारे पोषणही कमी होते. मात्र ज्या लोकांनी अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांसोबत उच्च गुणवत्ता असलेला आहार घेतला, त्यांच्या मेंदूवर पडणापा प्रभाव कमी झाल्याचेही दिसून आले.

सॅन डिएगो येथील 2022 अल्झायमर असोसिएशन आंतरराष्ट्रीय परिषदेत सोमवारी हा अभ्यास सादर करण्यात आला. यासाठी 10 वर्षांमध्ये 10,000 लोकांचा अभ्यास करण्यात आला, त्यांचे सरासरी वय 51 होते. सहभागी लोकांच्या विचार करण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी, डॉक्टरांच्या टीमने त्वरित आणि विलंबित शब्द आठवणे, शब्द ओळखणे आणि काही तोंडी चाचणी घेतली होती.

युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो मेडिकल स्कूलच्या जेरियाट्रिक्स विभागातील सहाय्यक प्राध्यापक, सह-लेखक डॉ. क्लॉडिया सुमोटो, यांनी स्पष्ट केले की ब्राझीलमध्ये, अल्ट्राप्रोसेस्ड खाद्यपदार्थ एकूण कॅलरीच्या 25% ते 30% असतात. आमच्याकडे मॅकडोनाल्ड, बर्गर किंग आहे, तसेच (इथले लोक) भरपूर चॉकलेट आणि ब्रेड खातात. त्यांनी पुढे असेही नमूद केले की अमेरिकेतील नागरिकांच्या कॅलरीजपैकी 48%, ब्रिटीश नागरिकांच्या कॅलरीजपैकी 56.8% आणि कॅनडातील लोकांच्या कॅलरीजपैकी 48% कॅलरीज या अल्ट्राप्रोसेस्ड पदार्थांमधून येतात.